आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत घसरण, पेट्रोल-डिझेलच्या दरांची स्थिती काय?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत घसरण, पेट्रोल-डिझेलच्या दरांची स्थिती काय?

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. जून महिन्यापासून कच्च्या तेलाचे दर 30 डॉलर प्रति बॅरल (Crude Oil Price) इतके घसरले आहे. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यामुळे महागाईची टांगती तलवार कायम आहे.

मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हसह अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे जगभरात मंदीची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर एका टप्प्यात ट्रेंड करत आहेत. देशात मागील पाच महिन्यांपासून आणि राज्यात जुलै महिन्यापासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. इंधन दरात कोणताही बदल नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला नाही.

कोणत्या शहरात किती दर?

शहर         पेट्रोल             डिझेल

नागपूर – १०६.०४              ९२.५९

पुणे       १०५.८४              ९२.३६

कोल्हापूर  १०६.४७            ९३.०१

औरंगाबाद  १०८                ९५.९६

परभणी   १०९.४१              ९५.८१

 

First Published on: September 20, 2022 10:44 AM
Exit mobile version