भारतीय सैन्य कोणालाही आपल्या जमिनीवर कब्जा करू देणार नाही – राजनाथ सिंह

भारतीय सैन्य कोणालाही आपल्या जमिनीवर कब्जा करू देणार नाही  – राजनाथ सिंह

दसऱ्याच्या निमित्ताने राजनाथ सिंह यांनी पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग येथील सुकना युद्ध स्मारकमध्ये शस्त्र पूजा केली. या दरम्यान राजनाथ सिंह म्हणाले की, ‘चीन आणि भारत सीमेवर शांती असायला हवी आणि तणाव संपवा अशी भारताची इच्छा आहे. परंतु मला खात्री आहे की, आपले सैन्य कोणालाही आपल्या देशाच्या एक इंच जमिनीवर कब्जा करू देणार नाही.’

आज दसऱ्याच्या निमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दार्जिलिंग आणि सिक्कीमच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारकात त्यांनी शस्त्रांची पूजा केली. यावेळी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे देखील उपस्थित होते. दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजन करण्याची परंपरा आहे.

शस्त्रांची पूजा झाल्यानंतर राजनाथ सिंह म्हणाले की, ‘सध्या भारत आणि चीनमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. भारताची इच्छा आहे की, हा तणाव संपवा, शांती निर्माण व्हावी, असा आमचा उद्देश आहे. मला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि खात्री आहे की, कोणत्याही परिस्थितीत आपले सैन्य भारताची एक इंचाची जमीनही दुसऱ्या हाती देणार नाहीत.’

गलवानमध्ये चीनने केलेल्या विश्वासघाताच्या संदर्भ देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, ‘नुकतेच भारत – चीन सीमेवर जे काही झाले, याबद्दल निश्चित माहितीच्या आधारावर मी म्हणतो की, आपल्या देशाच्या जवानांनी ज्याप्रकारे त्याची भूमिका पार पाडली आहे. जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्याच्या शौर्यचा आणि धैर्याची चर्चा सुवर्ण अक्षरात होईल.’


हेही वाचा – CAA चा देशातील कुठल्याही नागरिकाला धोका नाही – सरसंघचालक मोहन भागवत


 

First Published on: October 25, 2020 11:01 AM
Exit mobile version