राजधानी एक्स्प्रेसमध्ये सापडले २६ प्रवासी कोरोनाबाधित; रेल्वे प्रवाशांमध्ये खळबळ

राजधानी एक्स्प्रेसमध्ये सापडले २६ प्रवासी कोरोनाबाधित; रेल्वे प्रवाशांमध्ये खळबळ

राजधानी एक्सप्रेस

देशात कोरोनाचा कहर अजूनही सुरूच आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकार अनलॉक प्रक्रियेअंतर्गत सूट देत आहे. अशा परिस्थितीत रेल्वेने नवीन गाड्यांच्या परिचालनची घोषणा देखील केली आहे, परंतु सोमवारी गुजरातमधील अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर दिल्लीहून अहमदाबादला पोहोचलेल्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये बसलेल्या २६ प्रवाशांच्या चाचणी दरम्यान कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. त्यामुळे सर्वच प्रवाशांमध्ये खळबळ उडाल्याचे दिसून आले.

अहमदाबाद महानगरपालिकेने सोमवारपासून बाहेरील राज्यातून आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी सुरू केली आहे. बाहेरील राज्यांमधून लोक गुजरातमध्ये येत असल्याने राज्यात कोरोना पसरू नये, यासाठी प्रवाशांच्या कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. सोमवारी ८०० हून अधिक प्रवाशांच्या कोरोना चाचणी घेण्यात आल्या त्यापैकी दिल्ली-अहमदाबाद राजधानी एक्स्प्रेसच्या २६ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी गुजरातमध्ये कोविड -१९ च्या १ हजार ३३५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे संक्रमित लोकांची संख्या वाढून १ लाख ४ हजार ३४१ झाली आहे. आरोग्य विभागाने म्हटले आहे की संसर्ग झाल्यामुळे आणखी १४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ३ हजार १०८ वर पोहचली आहे. विभागाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आतापर्यंत ८४ हजार ७५८ लोक बरे झाले आहेत, तर १२२१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रिकव्हरीचा दर ८१.२३ टक्के झाला आहे.


चीनला आणखी एक धक्का; चायनीज टिव्ही फॅक्ट्री बंद करणार Samsung
First Published on: September 7, 2020 6:53 PM
Exit mobile version