दिल्ली विधानसभा: आपला झटका, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पिछाडीवर

दिल्ली विधानसभा: आपला झटका, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पिछाडीवर

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु आहे. आपने ५० हून अधिक जागांवर आघाडी घेत सर्वांनाच मागे टाकले आहे. भाजप केवळ १५ जागा घेऊन पुढे आहे, तर काँग्रेसची हाराकिरी सुरुच असून अद्याप शून्य जागा त्यांना मिळवता आल्या आहेत. मात्र आम आदमी पक्षासाठी एक मोठी धक्कादायक बातमी येत आहे. केजरीवाल सरकार मधील महत्त्वाचे मंत्री आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे पटपडगंज येथून १५०० मतांनी पिछाडीवर पडले आहेत. या मतदारसंघात भाजपचे रविंद्र सिंह नेगी सध्या आघाडीवर आहेत.

८ फेब्रुवारी रोजी जेव्हा मतदान झाले तेव्हा सिसोदिया यांच्या पटपडगंज मतदारसंघात ६२.५९ टक्के मतदान झाले होते. दिल्लीत केजरीवाल यांच्या नवी दिल्ली या मतदारसंघानंतर सर्वात चर्चेत आहेत ते मनीष सिसोदिया. कारण केजरीवाल हे नावाला मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे कोणतेही खाते नव्हते. सिसोदिया हे सर्व खात्यांकडे लक्ष देत होते. तसेच दिल्लीत सरकारी शिक्षणामध्ये ज्या सुधारणा झाल्या आहेत, त्याच्यापाठी शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांचे काम असल्याचे बोलले जात होते. जर सिसोदिया यांचा पराभव झाला, तर त्यांची कमतरता आपला सरकारमध्ये भासू शकते.

First Published on: February 11, 2020 11:25 AM
Exit mobile version