Toolkit case: दिशा रवीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Toolkit case: दिशा रवीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

ToolKit Case: दिशा रवीला जामीन नाही; न्यायालय २३ फेब्रुवारीला देणार निर्णय

सध्या सर्वाधिक चर्चित असलेले प्रकरण म्हणजे टूलकिट प्रकरण. याप्रकरणी २२ वर्षीय पर्यावरणवादी तरुणी दिशा रवी हिला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली होती. त्यामुळे देशातील अनेक तरुणमंडळी याला निषेध करताना दिसत आहेत. फक्त तरुण मंडळीच नाही तर राजकीय पक्ष नेत्यांपासून ते बॉलिवूड कलाकर दिशाच्या अटकेचा निषेध करत आहेत. पण आज पटियाला न्यायालयाने दिशाची ३ दिवसांच्या न्यायलयीन कोठडीत रवानगी केली आहे. यापूर्वी दिशाला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर कोठडीची मुदत संपल्यानंतर ३ दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळून ३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आज (शुक्रवारी) दिल्ली पोलिसांनी दिशाला पटियाला न्यायालयात हजर करण्यात आले होते.

कोण आहे दिशा रवी?

दिशा रवी पर्यावरणवादी असून ती जलवायूबाबत जनजागृती करते. दिशा मूळची बेंगळुरूची असून ती बेंगळुरूच्या प्रतिष्ठित माऊंट कार्मेलची विद्यार्थीनी आहे. दिशाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केलेल्या ग्रेटा थनबर्गला पाठिंबा दर्शवला होता. ग्रेटाच्या ट्विटमध्ये आंदोलन कसे करावे, याबाबतची माहिती देणारे टुलकिट शेअर केले होते. यालाच दिशाने देखील पाठिंबा दर्शवला. त्यामुळे दिशाविरोधात देशविरोधी कटकारस्थान रचल्याचा आरोप करण्यात आला. पण दिशाने फक्त शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी असे केले असल्याचे सांगितले. पण तरी दिल्ली पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिशाला अटक केल्यानंतर पहिल्यांदा ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या दिवसांमध्ये दिशाची सखोल चौकशी करण्यात आली.


हेही वाचा – मंगळावर आज नासाचे Perseverance Rover होणार लँड


 

First Published on: February 19, 2021 6:06 PM
Exit mobile version