दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया रुग्णालयात दाखल, श्वास घेण्यास होतोय त्रास

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया रुग्णालयात दाखल, श्वास घेण्यास होतोय त्रास

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ताप आणि श्वास घेण्याच्या त्रासानंतर लोकनायक जयप्रकाश (LNJP) रुग्णालयामध्ये दाखल केले गेले. १४ सप्टेंबरला मनीष सिसोदिया कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर त्यांनी स्वतःला त्यांनी घरीच आयसोलेट करून घेतले होते.

कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट केले होते की, ‘थोडा ताप आल्यानंतर कोरोना चाचणी केली, ज्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मी स्वतःला आयसोलेटेड करून घेतले आहे. सध्या ताप किंवा इतर कोणतीही समस्या नाही आहे. मी पूर्णपणे ठीक आहे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांमुळे लवकरच पूर्णपणे बरा होऊन कामावर परत येईन.’

यापूर्वी दिल्लीचे तीन आमदार गिरीश सोनी, प्रमिला टोकस आणि विशेष रवि कोरोनाबाधित झाल्याचे आढळले होते. विशेष रवि याआधी देखील कोरोनाबाधित आढळले होते. त्यांच्या अगोदर दिल्लीचे सरकारमधील आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर १४ सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते. ज्यामध्ये केवळ विधेयकासंदर्भात काम करायचे होते. मनीष सिसोदिया यांच्या प्रकृतीमुळे या सत्रात त्यांनी भाग घेतला नव्हता. केवळ एका दिवसासाठी अधिवेशन बोलाविल्याबद्दल भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात आला आणि प्रश्नोत्तराचा तास न ठेवण्यावर निशाणा साधला होता.


हेही वाचा – Video Viral: ‘भारत सीमेवर जाताना चीनी सैनिकांना भीती वाटते, रडूही कोसळतं’


 

First Published on: September 23, 2020 10:48 PM
Exit mobile version