चिअर्स! दारू स्वस्त होणार, सरकाराने घेतला नवीन निर्णय!

चिअर्स! दारू स्वस्त होणार, सरकाराने घेतला नवीन निर्णय!

alcohol party

तमाम मद्यप्रेमींसाठी खूषखबर आहे मद्द्यावरील ७० टक्के ‘कोरोना शुल्क’ लागू करण्यात आले होते ते मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळं महसूल बुडाल्याने सरकारी तिजोरीवर आलेला ताण कमी करण्यासाठी दिल्लीच्या केजरीवाल सरकारने सर्व प्रकारच्या मद्यावर ७० टक्के ‘कोरोना शुल्क’ लागू केले होते. यामुळे मद्यप्रेमींच्या खिशाला चांगला भुर्दंड पडत होता. मात्र ‘कोरोना शुल्क’ मागे घेतल्यामुळे आता छापील किरकोळ विक्री किंमतीत मद्य मिळू शकणार आहे.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात सरकारने दारू विक्रीला परवानगी देण्यात आली होती. सरकारने ५ मे पासून मद्याची दुकानं खुली करण्यात परवानगी दिली होती. यावेळी मद्यप्रेमींची मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळत होती. ती गर्दी टाळण्यासाठी होम डिलीव्हरी आणि महसूलात वाढ व्हावी यासाठी ७० टक्के ‘करोना शुल्क’ लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दिल्लीत ७० टक्के इतक्या मोठ्या प्रमाणावर सर्व प्रकारच्या मद्यावर ‘कोरोना शुल्क’ लागू करण्यात आल्याने मद्याच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणार घट पहायला मिळाली आहे. मात्र १० जूनपासून हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

CIABC चे महासंचालक विनोद गिरी यांनी दिल्ली सरकारला पत्राद्वारे सांगितले की, “सध्याच्या उपलब्ध डेटानुसार, आम्ही व्यक्त केलेली भीती खरी ठरली आहे. सुरुवातीला झालेल्या मद्यविक्रीनंतर मे महिन्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.”


हे ही वाचा – आता कोरोना पॉझिटिव्हवर घरीच होणार उपचार, ‘या’ असतील अटी!


 

First Published on: June 7, 2020 5:44 PM
Exit mobile version