दिल्लीच्या हॉटेल-गेस्ट हाऊसमध्ये चिनी लोकांना बंदी!

दिल्लीच्या हॉटेल-गेस्ट हाऊसमध्ये चिनी लोकांना बंदी!

भारत आणि चीन दरम्यान तणाव वाढत आहे. गलवान घाटीतील हिंसक हल्ल्यानंतर भारतीय लोक चीन विरोध आक्रमक होताना दिसत आहेत. आज दिल्लीच्या हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये चिनी लोकांना राहू न देण्याचा निर्णय घेतला. अखिल भारतीय व्यापारी परिसंघ (कॅट)च्या चिनी वस्तूंच्या बहिष्काराच्या आव्हानानंतर दिल्लीच्या बजेट हॉटल संघटना आणि दिल्ली हॉटेल अँड गेस्ट हाउस ओनर्स असोसिएशन (धुर्वा)ने मोठा निर्णय घेतला आहे. संघटनेने अशी घोषणा केली की, चीन करत असलेल्या कुरापती पाहता दिल्लीच्या हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये आता कोणत्याही चिनी लोकांना राहू न देण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्लीत अंदाजे ३ हजार बजेट हॉटेल आणि गेस्ट हाऊस आहेत. यामध्ये जवळपास ७५ हजार रुम आहेत. दिल्ली हॉटेल अँड गेस्ट हाऊस ऑनर्स असोसिएनचे महामंत्री महेंद्र गुप्ता यांनी अशी माहिती दिली की, चीन ज्याप्रकारे भारतासोबत व्यवहार करत आहेत आणि चीनच्या हिंसक हल्लामुळे भारतीय जवान शहीद झाले आहे. या कारणामुळे दिल्लीतील सर्व हॉटेल व्यवसायिकांमध्ये द्वेष निर्माण झाला आहे.

ते पुढे म्हणाले की, कॅटने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम राबवली. यामध्ये दिल्लीतील हॉटेल आणि गेस्ट हाऊस सामील आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता दिल्लीतील हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये चिनी लोकांना राहायला देणार नाहीत. कॅटचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयालामुळे कॅटच्या मोहीमेत देशातील विविध भागातील लोक सहभागी होत आहे.


हेही वाचा – Corona Update: देशात २४ तासांत सर्वाधिक १६,९२२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ!


 

First Published on: June 25, 2020 3:02 PM
Exit mobile version