दिल्ली हिंसाचारप्रकरणी आरोपपत्रात येचुरी, यादव यांच्या नावाचा समावेश

दिल्ली हिंसाचारप्रकरणी आरोपपत्रात येचुरी, यादव यांच्या नावाचा समावेश

दिल्लीत फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या दंगलप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस सीताराम येचुरी, स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव, अर्थतज्ज्ञ जयंती घोष, दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक आणि मानवाधिकार कार्यकर्ते अपूर्वानंद तसेच माहितीपट निर्माते राहुल रॉय यांची नावे दंगलीचा कट रचणाऱ्यांमध्ये समाविष्ट केली आहेत. या लोकांनी नागरिकता संशोधन विधेयकाचा (सीएए) विरोध करणाऱ्यांना ‘कोणतीही हद्द पार करा’ असा सल्ला दिला होता. सीएए-एनआरसीला मुस्लिम विरोधी सांगत या समाजात नाराजी पसरवली आणि केंद्र सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी निषेध आंदोलनाचे आयोजन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दिल्लीच्या उत्तर पूर्व जिल्ह्यात २३ ते २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये या सर्वांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. आरोपपत्रात दावा केला आहे की, दंगलीत ५३ लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच ५८१ लोक जखमी झाले होते. ज्यांपैकी ९७ गोळी लागून जखमी झाले होते. जेएनयूची विद्यार्थीनी देवांगना कालिता आणि नताशा नरवाल तसेच जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठाची विद्यार्थीनी गुलफिशा फातिमा हिचाही समावेश आहे.

या आरोपपत्रात येचुरी आणि यादव यांच्याशिवाय फातिमाच्या जबाबात भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण, युनायटेड अगेन्स्ट हेटचा कार्यकर्ता उमर खालिद तसेच माजी आमदार मतीन अहमद आणि अमानतुल्ला खान अशा काही मुस्लिम नेत्यांची नावेही यात समाविष्ट आहेत.

हेही वाचा –

First Published on: September 12, 2020 11:46 PM
Exit mobile version