सासरच्या लोकांनी मारहाण केली म्हणून पोलिसाची आत्महत्या

सासरच्या लोकांनी मारहाण केली म्हणून पोलिसाची आत्महत्या

दिल्ली पोलिसाची आत्महत्या

दिल्ली सचिवालयामध्ये तैनात असलेल्या हेड कॉन्स्टेबलने आपल्याच सर्विस रिव्हॉलवरने गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. ३५ वर्षिय हेड कॉन्स्टेबल सोहनवीर सिंह दिल्ली सचिवालयच्या गेट क्रमांक ३ वर व्हिव्हीआयपी पार्किंमध्ये तैनात होते. आत्महत्या करण्याच्या एक दिवस आधी सोहनवीर यांच्या सासऱ्याने त्यांना मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्यामुळे सोहन वीर खूप नाराज झाले होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाइड नोट लिहून ठेवली होती.

व्हायर व्हिडिओमुळे होते चिंतेत

सुसाइड नोटमध्ये सिंह यांनी सध्या ते मानसिक तणावात असल्याचे सांगितले आहे. पत्नीसोबत होणारी भांडण आणि सासऱ्याने केलेल्या मारहाणीबद्दल त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. सोहन वीर यांना गुरुवारी त्यांच्या सासरकडच्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ शेजारच्यांनी बनवला होता. हा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सोहन वीर खूप चिंतेत आले होते. सोहन वीर यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे की, सोहनवीरला मारहाण करणारा व्यक्ती त्याचा मेहूणा असून तो उत्तरप्रदेश पोलीसमध्ये कार्यरत आहे.

आत्महत्येपूर्वी लिहली होती सुसाइड नोट

आत्महत्या करण्यापूर्वी सोहनवीर यांनी सुसाइड नोट आणि मारहाण केल्याचा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवला. आत्महत्येच्या काही तास आधी सोहनवीर यांनी आपल्या भाच्याशी फोनवरुन बोलणे केले होते. आपण जीवनाला कंटाळो असल्याने त्यांनी त्याला सांगितले होते. सोहनवीरच्या कुटुंबियांनी सांगितले आहे की, मागच्या ५ वर्षापासून सोहनवीर यांचे त्यांच्या पत्नीसोबत भांडण सुरु होते. त्यांची पत्नी दिल्ली पोलीसमध्ये कॉन्स्टेबल असून नंद नगरी पोलीस स्टेशनमध्ये तैनात आहे. पोलिसांनी सोहनवीर यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. तसंच पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून तपास सुरु आहे.

First Published on: November 17, 2018 2:45 PM
Exit mobile version