Telangana News : अमित शहांच्या व्हिडीओची छेडछाड; तेलंगणा CM रेवंथ रेड्डींना दिल्ली पोलिसांचे समन्स

Telangana News : अमित शहांच्या व्हिडीओची छेडछाड; तेलंगणा CM रेवंथ रेड्डींना दिल्ली पोलिसांचे समन्स

तेलंगणा : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना दिल्ली पोलिसांनी समन्स बजावला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडीओ एडिट करुन चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी रेवंथ रेड्डी यांच्याविरोधात अॅक्शन घेतली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी रेवंथ रेड्डी यांना हजर राहण्यास सांगितलं आहे. (delhi police sends summon to telangana cm revanth reddy in home minister amit shah fake video on social media viral)

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वेगळंच विधान केलं होतं आणि व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वेगळंच विधान दाखवण्यात आले होते, असा आरोप रेवंथ रेड्डी यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी रेवंथ रेड्डी यांनी समन्स पाठवला आहे. दिल्ली पोलिसांनी रेवंथ रेड्डी यांना पाठवलेल्या समन्समध्ये चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

दिल्ली पोलिसांच्या समन्समध्ये रेवंथ रेड्डी यांना 1 मे रोजी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ज्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा व्हिडीओ एडिट केला आहे. त्या संबंधितांनाही चौकशीसाठी घेऊन येण्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यामुळे रेवंथ रेड्डी हे चौकशीसाठी हजर राहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र काँग्रेस (युथ) सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा दाखल

याशिवाय, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा बनावट व्हिडीओ शेअर करणाऱ्या महाराष्ट्र काँग्रेस (युथ) सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. यावेळी ज्या सोशल मीडियावरील अकाउंट्सवरून बनावट व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे त्याची तपशीलवार माहितीही पोलिसांना देण्यात आली. यामध्ये महाविकास आघाडीशी संबंधित महाराष्ट्र काँग्रेसच्या युथ एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम अकाऊंटचा समावेश आहे.


हेही वाचा – Prajwal Revanna Sex Scandal : प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडलप्रकरणी SIT ची स्थापन

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 29, 2024 7:26 PM
Exit mobile version