घरताज्या घडामोडीPrajwal Revanna Sex Scandal : प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडलप्रकरणी SIT ची स्थापन

Prajwal Revanna Sex Scandal : प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडलप्रकरणी SIT ची स्थापन

Subscribe

जनता दल सेक्युलर (जेडीएस) खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या व्हिडिओ प्रकरणाच्या संदर्भात SIT स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांवरील लैंगिक हिंसाचाराच्या आरोपांसह हसन जिल्ह्यात अश्लील व्हिडिओ क्लिप प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर SIT ची स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्नाटक : जनता दल सेक्युलर (जेडीएस) खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या व्हिडिओ प्रकरणाच्या संदर्भात SIT स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांवरील लैंगिक हिंसाचाराच्या आरोपांसह हसन जिल्ह्यात अश्लील व्हिडिओ क्लिप प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर SIT ची स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत कर्नाटकाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती दिली आहे. विशेष म्हणजे प्रज्वल रेवन्ना हे माजी पंतप्रधान एचडी देवेगोवडा यांचे नातू आहेत. (Prajwal Revanna Sex Scandal Grandson Of Former Pm Hd Deve Gowda Government Announces SIT In Karnataka)

कर्नाटकातील हसन जिल्ह्यात अश्लील व्हिडिओ क्लिप प्रसारित केल्या जात असून, त्यामध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी याबाबत सरकारला पत्र लिहून एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या दोन दिवस अगोदर हे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

- Advertisement -

महिला आयोगाच्या पत्रात काय?

कर्नाटक राज्य महिला आयोगाने गुरुवारा (25 एप्रिल) मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून कथित लैंगिक घोटाळ्याची विशेष चौकशी करण्याची मागणी केली होती. राज्यातील एका प्रमुख राजकारण्याचा समावेश असलेले कथित खासगी व्हिडिओ सार्वजनिक झाल्यानंतर महिला आयोगाने हे पत्र लिहिले होते. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही तासांनंतर, पीडितांपैकी कोणीही आरोपी राजकारण्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी पुढे आलेला दिसत नाही. या राजकीय नेत्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी हजारो महिलांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचा महिला आयोगाच्या सदस्यांचा दावा आहे.

दरम्यान, प्रज्वल रेवन्ना शनिवारी सकाळी जर्मनीला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. जेडीएस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे निवडणूक एजंट पूर्णचंद्र तेजस्वी एमजी यांनी या अश्लील व्हिडिओ-फोटोप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच, नवीन गौडांनी प्रज्वल रेवन्नाची बदनामी करण्यासाठी हे अश्लील व्हिडिओ शेअर केल्याचे त्याने म्हटले आहे.

- Advertisement -

याशिवाय, नवीन गौडा आणि इतरांनी व्हिडिओ आणि फोटो तयार केल्या. हसन लोकसभा मतदारसंघात प्रज्ज्वल रेवन्ना यांची बदनामी करण्यासाठी ते पेन ड्राइव्ह, सीडी आणि व्हॉट्सॲपद्वारे अश्लील व्हिडिओ आणि फोटोंमध्ये प्रसारित केल्याचे पोलिसांच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.


हेही वाचा – Politics : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसमध्ये धक्काबुक्की, दिल्लीतील घटनेने सर्वच चकीत

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -