दिल्लीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; केवळ २५० रुपयांसाठी देहविक्री

दिल्लीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; केवळ २५० रुपयांसाठी देहविक्री

दिल्लीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

दिल्लीच्या अमन विहारमध्ये चालवण्यात येणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात दिल्ली महिला आयोगाला यश आले आहे. दिल्ली पोलिसांनी सेक्स रॅकेट चालणाऱ्या घरावर छापा टाकत ७ पुरुष आणि ३ मुलींना ताब्यात घेतले. तर ज्या घरामध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होते त्या घराचा मालक इतर ४ मुलींसह पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दिल्लीमध्ये सेक्स रॅकेटच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र केवळ २५० रुपयासाठी हा सेक्स रॅकेटचा अतिशय किळसवाणा प्रकार दिल्लीच्या अमन विहार परिसरात सुरु होता.

काय आहे घटना?

दिल्लीच्या अमन विहार परिसरात राहणाऱ्या अज्ञात व्यक्तिने दिल्ली महिला आयोगाच्या १८१ महिला हेल्पलाईन नंबरवर कॉले केला. ही माहिती मिळताच गुरुवारी सकाळी महिला आयोगाच्या एका टीमने अज्ञात व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार परिसरात धावे घेतली. आयोगाच्या टीमने ज्या घरात सेक्स रॅकेट सुरु होते त्या घराच्या आसपास सापळा रचला होता. दिवसभर ते पहाणी करत असताना त्यांच्या असे निदर्शनास आले की, सकाळी १०.३० वाजता ४ मुली घरामध्ये गेल्या. १५ मिनिटानंतर १ मुलगी घरामध्ये गेली. त्यानंतर कार आणि बाईकवरुन आलेली काही पुरुष घरामध्ये गेले. दरम्यान, घराच्या प्रवेश करण्याआधी प्रत्येक पुरुषाला घराबाहेरुन फोन करावा लागत होता. तसंच ज्या घरामध्ये सेक्सरॅकेट सुरु होते त्या घराच्या बाहेर बांबूचे कुंपण घातले होते. त्यामुळे आतमध्ये काय हालचाली सुरु होत्या त्या कळत नव्हत्या.

अशी केली कारवाई

दरम्यान, महिला आयोगाच्या टीमने १०० नंबरवर कॉल करुन दुपारनंतर पोलिसांच्या टीमला घराजवळ बोलावले. त्यांनी पोलिसांसह घरावर छापा टाकला. तर त्यांना घरामध्ये ६- ७ पुरुष आणि ३ मुली दिसल्या. या सर्वांना त्यांनी रंगेहात अटक केली. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, घराचा मालक मागच्या दरवाज्याने ४ मुलींनना घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. आयोगाची टीम अटक केलेल्या सर्व लोकांना घेऊन अमन विहार पोलीस ठाण्यात घेऊन गेली. या सर्व मुली अल्पवयिन होत्या आणि त्या आपल्या स्वछेने हा व्यापार करत होत्या.

पोलिसांनी घरमालकाला केली अटक

महिला आयोगाच्या टीमने सांगितले की, आम्ही ताब्यात घेतलेल्या मुलींची चौकशी करण्यापूर्वीच घर मालकाने त्यांना धमकी दिली होती की, हे काम तुम्ही जबरदस्तीने करता हे सांगू नका. घरमालक त्यांना पैसे देत होता त्यामुळे त्यांना त्याने दमदाटी केली होती. महिला आयोगाच्या टीमने घर मालकाची चौकशी केली असता त्याने उलटसुटल उत्तर देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अमन विहार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत घरमालकाला अटक केली आहे.

प्रति ग्राहक देत होते २५० रुपये

दरम्यान, ज्या मुलींना महिला आयोगाने ताब्यात घेतले त्या मुलींपैकी एकिने सांगितले की, त्यांना एका प्रति ग्राहक फक्त २५० रुपये दिले जातात. तसंच प्रत्येक मुलीला सात ग्राहकांसोबत झोपावे लागते. तर दुसऱ्या मुलीने सांगितले की, ती अनाथ आहे. तर आणखी एका मुलीने सांगितले की, तिचा पती तिचा व्यसनाधिन नवरा तिचा छळ करतो आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी तिने हा मार्ग स्विकारला आहे.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, वेश्याव्यवसाय गुलामगिरीचा सर्वात वाईट प्रकार आहे. ही अतिश लाजिरवाणी गोष्ट आहे की, राजधआनी दिल्लीमध्ये अशाप्रकारचे रॅकेट मोठ्याप्रमाणावर सुरु आहे. महिला आयोग ज्या मुलींना ताब्यात घेतले आहे त्यांची समुपदेशन करेल त्यानंतर त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी मदत करेल. पोलिसांनी घर मालकाविरोधात कठोर कारवाई करत त्याचे घर सील केले पाहिजे अशी मागणी मालीवाल यांनी केली आहे.

First Published on: April 20, 2019 4:34 PM
Exit mobile version