Corona: तब्बल १८ आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; दिल्लीतील कॅन्सर इंस्टिस्टुट केले बंद

Corona: तब्बल १८ आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; दिल्लीतील कॅन्सर इंस्टिस्टुट केले बंद

आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयाचा ठेकेदार बदला सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत यांची मागणी

राजधानी दिल्लीतील दिल्ली स्टेट कॅन्सर इंस्टिट्युट हॉस्पिटलमधील तब्बल १८ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामुळे आता दिल्ली स्टेट कॅन्सर इंस्टिट्युट हे बंद ठेवण्याचा निर्णय हॉस्पिटल प्रशासनाने घेतला आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या १९ कॅन्सरग्रस्त रुग्णांना शहरातील इतर खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येईल, अशी माहितीही हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून आता देशभरात ४,७५७ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. तर १३२ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. सोमवारी ४७९ नवीन रुग्ण आढळून आले होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देशातल्या कोरोनाच्या फैलावाची सद्यस्थिती सांगितली. यामध्ये देशात आत्तापर्यंत एकूण ४ हजार ६७ कोरोनाग्रस्त असून त्यात गेल्या २४ तासांत ६९३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकूण रुग्णसंख्येपैकी १४४५ रुग्ण हे दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या तबलीगी मकरजशी संबंधित आहेत. तसेच, एकूण रुग्णांपैकी २९१ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची देखील माहिती आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.

हेही वाचा –

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली; कोरोनाग्रस्तांची संख्या ८९१ वर

First Published on: April 7, 2020 11:30 AM
Exit mobile version