घरCORONA UPDATEराज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली; कोरोनाग्रस्तांची संख्या ८९१ वर

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली; कोरोनाग्रस्तांची संख्या ८९१ वर

Subscribe

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ८९१ वर पोहोचली आहे.

कोरोनाच्या रूग्णात दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. आज, मंगळवारी राज्यात २३ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ८९१ वर पोहचली आहे. राज्यातील सांगली येथे एका नव्या रुगणाची वाढ झाली असून पुण्यात ४ तर बुलढाणा येथे २, मुंबईत १०, ठाण्यामध्ये १, नागपूरमध्ये २ तर अहमदनगरमध्ये ३ अशी कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे.

राज्य कोरोनाग्रस्तांची संख्या ८९१

  • मुंबई – १०
  • ठाणे – १
  • पुणे – ४
  • अहमदनगर -३
  • सांगली – १
  • बुलढाणा – २
  • नागपूर – २

    अहमदनगरची संख्या  २५ वर

    कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आता अहमदनगरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या संशयितांच्या स्त्राव चाचणीत तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर श्रीरामपुरमध्ये देखील एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आता अहमदनगरच्या कोरोनाबाधितांची संख्या २५ वर गेली आहे. सध्या या रुग्णावर पुण्यात उपचार सुरु आहेत.

    - Advertisement -

    हेही वाचा – नगरकरांची चिंता वाढली; कोरोनाबाधितांचा आकडा २५ वर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -