दिल्लीचे आरोग्यमंत्री रुग्णालयात दाखल; श्वासोच्छवासाचा त्रास

दिल्लीचे आरोग्यमंत्री रुग्णालयात दाखल; श्वासोच्छवासाचा त्रास

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली आहे. मंगळवारी त्यांना दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सत्येंद्र जैन यांना श्वास घेण्यात त्रास होत होता, जे कोरोना विषाणूचं लक्षण आहे. सत्येंद्र जैन यांची कोरोना विषाणूची चाचणीही करण्यात आली आहे. त्यांच्या चाचणीचा अहवाल लवकरच समोर येईल. ते सध्या रूग्णालयात ऑक्सिजनच्या आधारावर आहेत.

स्वत: सत्येंद्र जैन यांनीही ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, तीव्र ताप आणि श्वासोच्छवासाच्या त्रासानंतर मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मी तुम्हाला ताजी माहिती देत राहिन. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन सत्यंदर जैन लवकर बरे व्हा अशी शुभेच्छा दिली आहे.

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन सतत बैठकांना उपस्थिती लावत होते. पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर अधिकाऱ्यांसमवेत अनेक बैठका घेतल्या तेव्हा सत्येंद्र जैन आरोग्यमंत्री म्हणून त्या बैठकीत उपस्थित होते. यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ताप आला होता तेव्हा त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. केजरीवाल यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी २ दिवस विश्रांती करत पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.


हेही वाचा – आमच्या भेटीनंतर सामनाने पुन्हा अग्रलेख लिहावा – बाळासाहेब थोरात


 

First Published on: June 16, 2020 12:02 PM
Exit mobile version