जो बिडेन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिकृत उमेदवार

जो बिडेन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिकृत उमेदवार

मंगळवारी रात्री येत्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाने अधिकृतपणे जो बिडेन यांच्या नावावर राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला आहे. ३ नोव्हेंबरला होण्याऱ्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत जो बिडन रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि सध्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देतील. यासंदर्भात जो बिडेन म्हणाले की, ‘राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी स्वीकारणे हा माझ्या आयुष्याचा सन्मान आहे.’

तीन दशकांत आपल्या राजकीय कारकीर्दीत डेमोक्रॅटिक पक्षाने राष्ट्राध्यपदाच्या उमेदवारीसाठी निवडण करणे ही आतपर्यंतची सर्वात मोठी कामगिरी आहे. जो बिडेन यांनी ट्विट करत म्हटले की, ‘अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी स्वीकारणे माझ्या आयुष्याचा सन्मान आहे.’

राज्य प्राइमरी आणि कॉकसदरम्यान बिडेन यांना २ हजार ६८७ प्रतिनिधींचा पाठिंबा होता. त्यांना प्रतिस्पर्धी बर्नी सँडर्सला यांच्या दुप्पट पाठिंबा होता. सँडर्स यांना १ हजार ७३ प्रतिनिधांचा पाठिंबा मिळाला होतो.

दरम्यान बिडेन यांना जून महिन्यातच ३ हजार ९०० पदाधिकाऱ्यांनी एकमुखी समर्थन दिल्याने ऑनलाईन मतदान ही केवळ औषचारिकता होती. ७२ वर्षीय जो बिडेन यांनी जानेवारी २०१९ ते जानेवारी २०१७ या कालावधीत अमेरिकेचे ४७ वे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. यावेळी राष्ट्राध्यक्ष पदी बराक ओबामा होते. आता राष्ट्राध्यक्षाचे नेतृत्व स्वीकारण्यास बिडेन उत्सुक आहेत.


हेही वाचा – अमेरिकेसाठी ट्रम्प चुकीचे राष्ट्राध्यक्ष – मिशेल ओबामा


 

First Published on: August 19, 2020 3:09 PM
Exit mobile version