घरताज्या घडामोडीअमेरिकेसाठी ट्रम्प चुकीचे राष्ट्राध्यक्ष - मिशेल ओबामा

अमेरिकेसाठी ट्रम्प चुकीचे राष्ट्राध्यक्ष – मिशेल ओबामा

Subscribe

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अमेरिकेच्या माजी प्रथम नागरिक मिशेल ओबामा यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे चुकीचे राष्ट्राध्यक्ष आहे, असे मिशेल ओबामा यांनी म्हटले आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, डेमोक्रॅटिक पक्षाच्या नॅशनल कॉन्फरन्सची सुरुवात सत्राला संबोधित करताना मिशेल ओबामा म्हणाल्या की, ‘डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या देशाचे चुकीचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ज्यांनी कठीण परिस्थिती निर्माण केल्या आहेत.’ पुढे मिशेल ओबामा म्हणाल्या की, ‘मी प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे बोलते की, डोनाल्ड ट्रम्प यांना काम करता येईल हे सिद्ध करण्यासाठी ट्रम्प यांना अनेक वेळा संधी मिळाली आहे. परंतु त्यांनी समस्यांकडून दुर्लक्ष केले. ते सध्याच्या समस्या देखील दूर करू शकले नाही. आम्हाला त्यांची गरज आहे, अशी ते व्यक्ती नाही आहे आणि हे तथ्य आहे.’

- Advertisement -

डेमोक्रॅटिक पक्षाचे हे सत्र राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवाराला औपचारिकरित्या नामांकित करण्यासाठी आयोजित केले गेले. कोरोना महामारीची बाब लक्षात घेऊन हे चार दिवसीय सत्र सोमवारी डिजिटल माध्यमातून सुरू झाले. या सत्रात ५५ वर्षीय सिनेटर कमला हॅरीस यांना उपाध्यक्षपदाची उमेदवार म्हणून औपचारिकरित्या नामांकन देण्यात येणार आहे.

‘काही लोकांकडून तुम्ही ऐकले नसेल की, आज आपण अशा देशात राहत आहोत जो विभाजित आहे आणि मी काळी माहिला आहे, जी डेमोक्रॅटिक पार्टीचे सत्र संबोधित करत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि ते झालेच पाहिजे. जर या निवडणुकीत बदल झाले नाहीत तर आणखी बिकट परिस्थिती होईल. जर याच्यावर मात करण्याचे ध्येय असले तर त्यासाठी बिडेन यांना मतदान करावे लागेल कारण आपले जीवन यावर अवलंबून आहे.’ ३ नोव्हेंबरला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत ७७ वर्षांचे बिडेन यांच्या विरोधात सध्या राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Covid 19 : अमेरिकेतील रुग्णसंख्या ११ दशलक्ष; तर मृतांचा आकडा ४ लाख पार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -