जामा मशिदही पाडा,मूर्ती सापडतील

जामा मशिदही पाडा,मूर्ती सापडतील

अयोध्येत राम मंदिराची निर्मिती करण्यावरून राजकाराण तापले असतानाच भाजप खासदाराने एक वादग्रस्त विधान केले आहे. दिल्लीतील जामा मशिदपाडा तेथूनही मूर्त्या बाहेर निघतील अशा प्रकारचे वक्तव्य भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. सुप्रीम कोर्टाने देशातील अनेक महत्व पूर्ण निर्णय दिले आहे. मात्र राम मंदिरावरून अद्याप काहीच उत्तर न दिल्याने सुप्रीम कोर्टाचा मी निषेध करतो. मागील काही वर्षांपासून ते ही मागणी करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुगल काळात हिंदुस्थानातील ३ हजार पेक्षा जास्त मशिदी मंदिरं तोडून उभारल्या असल्याचाही त्यांनी दावा केला. निवडणुकाजवळ आल्यावरच अशा प्रकारचे वक्तव्य केल्यामुळे आता हुंदूत्वाचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर येणार असल्याचे चित्र आहे.

“राजकारणात मी पाऊल ठेवले तेव्हा मी पहिल्यांदा मथुरामध्ये एक वक्तव्य केले होते. मी त्यावेळी म्हणालो होतो की अयोध्या,मथुरा सोडा दिल्लीतील जामा मशिद पाडा. मशिदीच्या शिड्यांखाली मूर्ती सापडल्या नाही तर मला फासावर लटकवा. मी आजही आपल्या त्या वक्तव्यावर ठाम आहे.”-  भाजप खासदार, साक्षी महाराज

राम मंदिर आणि राजकारण

२०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं सत्तेत आल्यानंतर अयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी करू असं आश्वासन दिलं होतं. पण, अद्याप देखील राम मंदिराबाबत कोणतीही हालचाल झालेली नसल्यानं भाजपला हिंदुत्ववादी संघटनेसह शिवसेनेनं देखील लक्ष्य केलं. शिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देखील राम मंदिरासाठी जमिन अधिग्रहण करा, कायदा करा अशी मागणी केल्यानं भाजपसमोरच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. यापूर्वी काही संतांनी देखील अयोध्येतील राम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच विहिंपनं देखील आता राम मंदिराच्या बांधणीसाठी शिवसेनेवर विश्वास दाखवल्यानं भाजपचा पाय आणखीन खोलात गेला आहे. या साऱ्या घडामोडी पाहता आता भाजप नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.

First Published on: November 23, 2018 10:11 PM
Exit mobile version