मतांसाठी नोटाबंदी; मुख्यमंत्र्यांचा आरोप

मतांसाठी नोटाबंदी; मुख्यमंत्र्यांचा आरोप

नोटाबंदीवरून आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशातील काळा पैसा बाहेर काढण्याच्या उद्देशानं नोटाबंदी जाहीर केली. पण, नोटाबंदी हा राजकीय कट असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदारांचे मत विकत घेणे अधिक सोपे झाले आहे असा आरोप चंद्रबाबु नायडू यांनी करत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. खिशामध्ये दोन हजाराचे बंडल घेऊन फिरल्यानंतर मतदाराला एक नोट दिली की मत विकत घेता येते. त्यामुळेच नोटाबंदी केली असा आरोप देखील चंद्रबाबु नायडू यांनी केला आहे. दरम्यान, आपण नोटाबंदीला विरोध केला होता असं चंद्रबाबु नायडू यांनी म्हटलं आहे. आमच्या सरकारनं कामं केली आहेत. त्यामुळे आम्हाला जनतेकडून मतं विकत घेण्याची वेळ येणार नाही असं देखील नायडू यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम येथे बोलत असताना त्यांनी ही टिका केली आहे.

नोटाबंदी हा राजकीय कट

नोटाबंदी हा राजकीय कट होता. त्याला आपण विरोध देखील केला होता. नोटाबंदीमुळे सामान्यांचे नुकसान झाले. अनेक जण बेरोजगार झाले. त्याबाबतचा अहवाल केंद्र सरकारला देखील दिला होता. शेतकरी, बेरोजगार युवक, सर्वसामान्यांना नोटाबंदीचा मोठा फटका बसला. नोटाबंदीचा फायदा घेत भाजपनं उत्तरप्रदेशमध्ये मतं विकत घेतली. भाजपशिवाय कुणाकडे पैसाच नव्हता. त्यामुळे भाजपचं फावलं. देशातील जनतेनं नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला. पण मोदींनी साऱ्यांचा विश्वासघात खेला असा आरोप देखील यावेळी चंद्रबाबू नायडू यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपचा मित्र पक्ष असलेल्या टीडीपीनं भाजपची साथ सोडली आहे.

First Published on: December 25, 2018 4:00 PM
Exit mobile version