दोन वेळा लसीकरण होऊनही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, AIIMSच्या प्रमुखांनी सांगितलं कारण

दोन वेळा लसीकरण होऊनही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, AIIMSच्या प्रमुखांनी सांगितलं कारण

दोन वेळा लसीकरण होऊनही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, AIIMSच्या प्रमुखांनी सांगितलं कारण

देशभरात कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे. कोरोनाची दोन हात करण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरणही सुरु करण्यात आले आहे मात्र तरीही कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. देशात कोरोना लस घेतल्यानंतरही लोकांना कोरोनाची लागण होत आहे. लसीकरणाचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येत आहे त्याचप्रमाणे लस घेतल्यानंतर शरीरात अँन्टीबॉडीज तयार होतात ज्या कोरोना विषाणूशी दोन हात करु शकतात. मात्र लोकांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अँन्टीबॉडीज तयार होऊनही चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे कोरोना चाचणी, कोरोना लसीकरण याबाबात अनेक प्रश्न आणि शंका लोकांच्या मनात कायम आहेत. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितले आहे.

आरटीपीसीआर टेस्टचा परिणाम हा केवळ ८० टक्के इतका आहे. २० टक्के लोकांच्या आरटीपीसीआर टेस्टमध्ये कोरोनाचे विषाणू दिसून येत नाहीत. एक्स रे, सिटी स्कॅन केल्यानंतर कोरोनाचे निदान केले जात आहे.  याविषीय डॉक्टर गुलेरिया म्हणतात, जर तुमची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर तुम्हाला कोरोनावर उपचार घेतले पाहिजेत. यात आणखी एक कारण आहे ते म्हणजे आरटीपीसीआर टेस्ट करणाऱ्यालाही ती टेस्ट योग्यरित्या करता आली पाहिजे. बऱ्याचदा स्वॉप टेस्ट करताना संपूर्ण नाकापर्यंत घेऊन जात नाहीत त्यामुळे विषाणूचे निदान करता येत नाही. त्यामुळे आरटीपीसीआर टेस्टमध्ये सॅम्पल्स योग्यरित्या दिले नाहीत तर कोरोना चाचणी निगेटिव्ह येते.

देशभरात कोरोना लसीकरणाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. अनेकांनी कोरोना लसीकरणाचे दोन्ही टप्पे पूर्ण केले आहेत. मात्र तरीही त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येत आहेत. त्याचप्रमाणे अनेकांनी लस घेतल्यानंतर त्यांच्या शरीरातील अँन्टीबॉडीजची संख्याही वाढल्याचे दिसून आले आहे, मात्र तरीही त्यांना कोरोनाची लागण होत आहे. कारण लसीमुळे आपल्याला कोरोना हा आजार होणार नाही मात्र कोरोनाचे इनफेक्शन होऊ शकते. लस घेतल्यानंतर शरीरात अँन्टीबॉडीज तयार होतात. मात्र तरीही आपल्या नाकात, घशामध्ये कोरोनाचे इनफेक्शन होऊ शकते. पुढील काही दिवसात इनफेक्शन वाढू शकते आणि कोरोना चाचणी पॉझिटिव्हही येऊ शकते. लस घेतल्यामुळे शरीरात तयार झालेल्या अँन्टिबॉडी कोरोना व्हायरसला वाढू देत नाही. त्यामुळे कोरोनाचा जास्त मोठा धोका आपल्याला होणार नाही. लस घेतल्यामुळे कोरोनाचा धोका संभवणार नाही. उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलला जाण्याची गरज भासणार नाही, असे एम्स रुग्णालयाच्या डायरेक्टर डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.


हेही वाचा – दिलासा! देशातील रुग्णालयात उभारणार १६२ ऑक्सिजन निर्मिती प्लँट

First Published on: April 18, 2021 6:12 PM
Exit mobile version