घरताज्या घडामोडीदिलासा! देशातील रुग्णालयात उभारणार १६२ ऑक्सिजन निर्मिती प्लँट

दिलासा! देशातील रुग्णालयात उभारणार १६२ ऑक्सिजन निर्मिती प्लँट

Subscribe

मोदी सरकारने देशातील सर्व राज्यांमध्ये १६२ 'ऑक्सिजन जनरेशन प्लँट' उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत अडीच लाखाहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आजची ही आकडेवारी धडकी भरवणारी आहे. एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे आता देशात लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची कमी पडू लागल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, ही ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने देशातील सर्व राज्यांमध्ये १६२ ‘ऑक्सिजन जनरेशन प्लँट’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑक्सिजन प्लँटच्या मदतीने १५४.१९ मॅट्रीक टन उत्पादन शक्य होणार आहे. यामुळे ऑक्सिजनवर असणाऱ्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास मदत होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी घेतलेल्या बैठकीत ऑक्सिजनचे बेड वाढवण्याचे देखील आदेश दिले आहेत.

- Advertisement -

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘या प्लँटमुळे मोठा फायदा होणार आहे. कारण सध्याच्या घडीला देशातील सर्वच राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी केली जात आहे. यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगढ, दिल्ली, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे’.

यापूर्वी केंद्र सरकारने ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन ५० हजार मॅट्रिक टन ऑक्सिजनची आयात करण्याचा निर्णय घेतला होता. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ‘वैद्यकीय ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ५० हजार मॅट्रिक टनची आयात करण्याचे टेंडर देण्यात येईल’, यामुळे ऑक्सिजनची कमतरता दूर होईल.

- Advertisement -

हेही वाचा – दोन दिवसांत मुंबईतील परिस्थिती पूर्ववत होईल – किशोरी पेडणेकर


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -