कोरोना युद्धात शेवटच्या श्वासापर्यंत सहभाग; ड्युटीदरम्यान पोलीसाचा मृत्यू

कोरोना युद्धात शेवटच्या श्वासापर्यंत सहभाग; ड्युटीदरम्यान पोलीसाचा मृत्यू

कोरोना युद्धात शेवटच्या श्वासापर्यंत सहभाग; ड्युटीदरम्यान पोलीसाचा मृत्यू

कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात थैमान घातलेले असताना पोलीस जनतेच्या रक्षणासाठी दिवसरात्र गस्त घालत आहेत. असे असताना इंदूर येथील परदेशीपुरा ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा ड्युटीदरम्यान मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या पोलीस कर्मचाऱ्याची तब्येत खराब होती. मात्र इंदूरमध्ये वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव आणि बिघडत चाललेल्या परिस्थितीत ते पोलीस आपले कर्तव्य बजावण्यासाठी ड्यूटीवर येत होते. त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव अबरार खान असून यांना अस्थमा व रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्या मृत्यूबाबत माहिती मिळताच त्यांच्या वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

अबरार खान यांच्या मृत्यूनंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती की नाही, सध्या याची चौकशी सुरू आहे. हे पोलीस त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजाबत असताना शेवटच्या श्वासापर्यंत ड्यूटीवर हजर होते. मात्र कामावर असताना त्यांनी आपले प्राण सोडले.

असा घडला प्रकार

इंदूर येथील परदेशीपुरा ठाण्यातील पदस्थ आरक्षक अबरार खान यांचे सोमवारी ड्युटीदरम्यान निधन झाले. तब्येत अचानक खराब झाल्याने त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथेच त्यांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी खान यांची तब्येत बिघडली होती. आराम केल्यानंतर ते पुन्हा ड्यूटीवर हजर झाले. रात्री पुन्हा त्यांची तब्येत बिघडली. मात्र कामाप्रती ते प्रामाणिक असल्याने खान हे औषध घेऊन आज सकाळी पुन्हा ड्युटीवर हजर झाले आणि मालवा मिल येथे ड्यूटीवर हजर झाले. मात्र पुन्हा तब्येत बिघडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दाखल केल्यानंतर त्यांना मृत्यू झाला.


VIDEO: कोरोनाविरुद्ध पुणे पोलिसांनीही कसली कंबर; रक्षणकर्त्यांची आर्त हाक नक्की ऐका!
First Published on: April 6, 2020 7:53 PM
Exit mobile version