तृणमूलची ‘खरेदी प्रक्रिया‘ गोव्याने ओळखली, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

तृणमूलची ‘खरेदी प्रक्रिया‘ गोव्याने ओळखली, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, आप आणि तृणमूल काँग्रेसनंही गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी तयारी केली आहे. दरम्यान सर्वच राजकीय पक्षांचे नेते एकामेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. गोव्याने तृणमूल काँग्रेसची खरेदी प्रक्रिया पाहिली असल्याचा घणाघात भाजप नेते आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. गोव्यात तृणमूलकडून खरेदी सुरु असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातून तृणमूल काँग्रेसवर घणाघात केला आहे. फडणवीस प्रतापसिंह राणे यांना भेटले तेव्हा त्यांच्याकडे बॅग होती यावरुन भाजपची खरेदी प्रक्रिया सुरु असल्याचा आरोप करण्यात येत होता. यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस म्हणाले की, मी भेटतो आहे त्यांच्यासारखा बॅग घेऊन खरेदीसाठी आलो नाही. तृणूल काँग्रेस गोव्यात खरेदी करण्यासाठी आली आहे. गोव्याच्या राजकारणात प्रतापसिंह राणे गेल्या ५० वर्षांपासून आहे. त्यामुळे त्यांना भेटायला जाण्यात काय अडचण असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान फडणवीस पुढे म्हणाले की, आम्हाला सूटकेसची आवश्यकता नाही. नारदा आणि शारदाचे घोटाळे आम्ही करत नाही. त्या घोटाळ्यातील पैसा त्यांच्याकडे आहे त्यामुळे ते बॅग घेऊन आले आहेत गोव्यातील सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकजण सांगतो आहे की, कशी खरेदी आणि विक्री झाली असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी ते काहीही बोलू शकतात. कोणाचे कोणाशी साठलोट आहे. हे जगाला माहिती आहे. ही मंडळी एका राज्यात भांडतात दुसऱ्या राज्यात एकत्र येतात आणि तिसऱ्या राज्यात भांडतात असे सोयीचे राजकारण आहे. तसेच अभिषेक बॅनर्जीसुद्धा सोयीच राजकारण करत आहेत. तृणूल काँग्रेस ही हिंदूविरोधी पार्टी आहे. अशा प्रकारची इमेज बंगालमधील दंग्यांनंतर झाले आहे. विशेषता निवडणुकीनंतर हिंदूंना टार्गेट करुन मारण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तोंडावर बोट ठेवून गप्प होत्या हे सर्वांनी पाहिले असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

गोव्यात एमजी पक्ष हा सुद्धा तृणमूलसोबत गेला आहे. जे लोकं हिंदूंवर अत्याचार करत आहेत जे लोकं लोकशाही मानत नाही. अशा लोकांसोबत एमजी गेल्यामुळे त्यांचे मत भाजपला मिळणार आहेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.


हेही वाचा : Goa Election : उत्पल पर्रिकरांची पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा, भाजपला मोठा धक्का

First Published on: January 21, 2022 7:40 PM
Exit mobile version