बसवराज बोम्मई होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, धर्मेंद्र प्रधान यांनी केली घोषणा

बसवराज बोम्मई होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, धर्मेंद्र प्रधान यांनी केली घोषणा

बसवराज बोम्मई होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, धर्मेंद्र प्रधान यांनी केली घोषणा

कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी बसवराज बोम्मई यांना देण्यात आली आहे. बी.एस. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरु होती. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कर्नाटक भाजपमधील ३ नावे चर्चेत होती परंतू यांच्यामध्ये बसवराज बोम्मई यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री आणि निरीक्षक धर्मेंद्र प्रधान यांनी मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांच्या नावाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी बसवराज बोम्मई, विश्वेश्वरा हेगडे कगेरी आणि केंद्रीय मंत्री कोळसा खणन मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी ही ३ नावे चर्चेत होती.

बीएस येडियुरप्पा यांनी सोमवारी कर्नाटक मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री कोण अशी चर्चा होती. दरम्यान कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार होते. पक्षश्रेष्ठींनी बोम्मई यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री म्हणून केली आहे. बोम्मई हे लिंगायत समाजाचे आहेत. येडीयुरप्पा यांच्यानंतर लिंगायत समजाचा मुख्यमंत्री करण्यासाठी आरएसएस आग्रही होती.

बसवराज बोम्मई नेमके कोण आहेत?

बसवराज बोम्मई हे लिंगायत समाजाचे आहेत. कर्नाटक सरकारमध्ये गृहमंत्री पदाची जबाबदारी बोम्मई यांच्याकडे आहे. बीएस येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय म्हणून बोम्मई मानले जातात. बसवराज बोम्मई यांनी जनता दलमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. बोम्मई ३ वेळा कर्नाटकमधील हावेरी जिल्ह्यातील शिगांव मधून आमदार झाले आहेत. येडियुरप्पा यांनी लिंगायत समाजाचा मुख्यमंत्री नको म्हणून सांगितले होते परंतु भाजपकडून पुन्हा एकदा लिंगायत समजाचा मुख्यमंत्री करण्यात आला आहे. बोम्मई यांनी जलसंपदा मंत्रिपदाची जबाबदारीही पार पाडली आहे.

बीएस येडियुरप्पा यांच्या शुभेच्छा

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी ट्विट करत नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना शुभेच्छा दिल्या आहेत. येडियुरप्पा यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मला विश्वास आहे की, तुम्ही कर्नाटकला विकासाच्या दृष्टीने पुढे न्याल आणि राज्यातील जनतेचा मागण्या पुर्ण कराल अशा शब्दांत बीएस येडियुरप्पा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

First Published on: July 27, 2021 9:20 PM
Exit mobile version