स्वातंत्र्यदिनी धोनी लडाखमध्ये

स्वातंत्र्यदिनी धोनी लडाखमध्ये

महेंद्रसिंह धोनी

मानाच्या लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत भारतीय क्रिकेट दलाचं नेतृत्त्व करणारा संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी स्वातंत्र्यदिनी नव्याने प्रस्थापण्यात आलेल्या लडाख या केंद्रशासित प्रदेशात हजर होता. सैन्यदलाच्या तुकडीबरोबर त्याने स्वातंत्र्य दिन साजरा केला.

5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने जम्मू काश्मीर येथे अनेक वर्षांपासून लागू करण्यात आलेला अनुच्छेद 370 रद्द करण्याचा निर्णय दिला. ज्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश आकारास आले. आतापर्यंतचा हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याची प्रतिक्रिया सर्वांनीच दिली. मुख्य म्हणजे निर्णयानंतर सर्वत्र तणावाची परिस्थिती असतेवेळी महेंद्रसिंह धोनी त्याच भागात सेवेत रुजू होता.

दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने धोनी बुधवारी या भागात पोहोचला जेथे त्याचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. ज्यानंतर सैन्यदल अधिकार्‍यांशी संवाद साधत पुढे त्याने सेना रुग्णालयालाही भेट दिली. जेथे त्याने रुग्णांशीही संवाद साधला. सोशल मीडियावर या क्षणांचे काही फोटोही व्हायरल होत आहेत. धोनी जितके दिवस सैन्यदलासोबत वावरत होता ते सर्वच दिवस तो एका जवानाचं आयुष्य जगत असल्याचं पाहायला मिळालं. आपली सेवा बजावणार्‍या धोनीचा हा अंदाज खर्‍या अर्थाने सार्‍यांचीच मनं जिंकून गेला. या सेवेसाठी त्याने क्रिकेट जगतातून दोन महिन्यांची सुट्टी घेतली होती. ज्यामुळे सध्या सुरु असणार्‍या वेस्ट इंडिज दौर्‍यांधमध्ये त्याचा सहभाग नाही.

First Published on: August 16, 2019 5:56 AM
Exit mobile version