Corona: वुहान लॅबमधूच पसरला ‘कोरोना व्हायरस’, ब्रिटनच्या गुप्तचर विभागाचा गौप्यस्फोट

Corona: वुहान लॅबमधूच पसरला ‘कोरोना व्हायरस’, ब्रिटनच्या गुप्तचर विभागाचा गौप्यस्फोट

ठाण्यात क्वारंटाईन रूग्णांचे हाल; १२ दिवसांपासून रूग्ण रिपोर्टच्या प्रतिक्षेत

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात उलथापालथ केली आहे. जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. जगातील २०० हून अधिक देशांना या रोगाने ग्रासले आहे. आतापर्यंत ६५ हजारांहून अधिक लोकांना मृत्यू कोरोनामुळे झाला असून १२ लाख जणांना त्याची लागण झाली आहे. तर अडीच लाखांच्या जवळपास लोकांवर उपचार होऊन ते बरेदेखील झाले आहेत. मात्र अजूनही या व्हायरसवर लस सापडलेली नसून जगभर त्यावर संशोधन सुरू आहे. हा व्हायरस जगभरात पसरलाच कसा, चीनच्या वुहान शहरातून सुरूवात झालेल्या या कोरोना व्हायरसचा इतका हाहाकार माजलाच कसा, याचा शोध कित्येक संशोधक घेत आहेत. वुहानच्या लॅबमधून हा व्हायरस पसरल्याची चर्चा अनेकदा झाली आहे. आता त्यावर शिक्कामोर्तब व्हावा, अशी माहितीही समोर येत आहे. ब्रिटनच्या एक गुप्तचर संस्थेच्या अहवालातून हा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.

हेही वाचा – मोठ्या निर्णयाची अपेक्षा: मोदींचा माजी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि विरोधी नेत्यांना फोन

काय आहे या अहवालात

चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा व्हायरस आणि त्यांच्या आजारांवर संशोधन करणाऱ्या दोन मोठ्या लॅब आहेत. त्यात शास्त्रज्ञांना इबोला, निपाह, सार्ससारख्या घातक व्हायरसवर संशोधन करत होते. त्यांना एक नवीनच व्हायरस सापडला. वटवाघळांमध्ये असलेल्या व्हायरसशी त्याचे साम्य आढळून आले. जानेवारी महिन्यातील ही घटना असल्याचे सांगितले जात आहे. याच लॅबमधून हा व्हायरस पसरला असल्याचे ब्रिटनच्या गुप्तचर अहवाल म्हटल्याचे वृत्त ‘डेली मेल’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. हा अहवाल ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना देण्यात आला आहे.

First Published on: April 5, 2020 7:41 PM
Exit mobile version