मोठ्या निर्णयाची अपेक्षा: मोदींचा माजी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि विरोधी नेत्यांना फोन

PM Narendra Modi called manmohan singh and pranab mukharjee

कोरोना व्हायरसचे संकट रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा केंद्रीय राजकारणात रंगली आहे. आज मोदींनी दोन माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, प्रतिभा पाटील, दोन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि एच. डी. देवगौडा यांच्याशी फोनवर संवाद साधला आहे. तर देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, नवीन पटनायक, एमके स्टालिन, प्रकाशसिंह बादल यांनाही फोन केल्याची माहिती मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ एप्रिल रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीशी कसे दोन हात करायचे, या विषयावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जाते. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे होणार आहे.