किंडर जॉय उत्पादने खाल्ल्याने जगात पसरतात रोग; वादानंतर अखेर कंपनीचे स्पष्टीकरण

किंडर जॉय उत्पादने खाल्ल्याने जगात पसरतात रोग; वादानंतर अखेर कंपनीचे स्पष्टीकरण

kinder joy

लंडन : किंडर जॉय उत्पादने जगभरातील मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. ही उत्पादने बनवणाऱ्या फेरेरो या कंपनीने आपले एक उत्पादन आरोग्यासाठी सुरक्षित न वाटल्याने ते बाजारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर UK च्या फूड सेफ्टी एजन्सीने (FSA) ग्राहकांना विशिष्ट Kinder ब्रँड उत्पादने वापरणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. FSA ला Kinder ची खाद्य उत्पादने आणि साल्मोनेलाच्या संसर्गाचा प्रसार यांच्यातील संबंध असल्याचा संशय आहे.

कंपनीने उत्तर दिले

कंपनीने सांगितले की, ‘काही देशांमध्ये साल्मोनेलाच्या संसर्गाच्या प्रकरणांत किंडर जॉयच्या उत्पादनांशी संभाव्य संबंधाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. फेरेरो या बाबींवर स्थानिक अन्न प्राधिकरणांना सहकार्य करत आहे. बाजारात प्रसिद्ध झालेल्या आमच्या कोणत्याही Kinder उत्पादनांमधून साल्मोनेचा प्रसार होत असल्याचं सिद्ध झालेलं नाही. फेरेरो हे अतिशय गांभीर्याने घेत आहे, कारण आमच्या ग्राहकांच्या आरोग्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

‘भारतातून कोणतेही उत्पादन परत मागवले जात नाही’

कंपनीने पुढे म्हटले आहे की, ‘फेरेरो इंडिया हे देखील स्पष्ट करते की, बेल्जियममध्ये करण्यात आलेल्या किंडर सरप्राईझच्या स्वेच्छेने काढण्याच्या यादीत भारताचे नाव समाविष्ट नाही. फेरेरो इंडिया आपल्या बारामती (पुणे) येथील प्लांटमध्ये किंडर जॉयचे उत्पादन करते. ते देशभरात विकले जाते, तेथून लागू असलेल्या स्थानिक नियमांचे पालन करून ते तयार केले जाते.

किंडर जॉय आणि किंडर सरप्राईजमधील फरक

कंपनीने सांगितले की, ‘किंडर सरप्राईज आणि किंडर जॉय या उत्पादनात फरक आहे. किंडर जॉयमध्ये दुधाळ आणि कोको स्प्रेडसह 2 लेपित वेफर बिस्किटे असलेले दोन भाग असतात. त्यात खेळण्यांचाही समावेश आहे. चॉकलेट आणि खेळण्यांना संरक्षणात्मक थराने वेगळे ठेवले जाते. दुसरीकडे किंडर सरप्राइजमध्ये दुधाचे पांढरे अस्तर असलेले बारीक मिल्क चॉकलेटचे कवच आहे. त्यात एक खेळणंही आहे. कंपनी अन्न सुरक्षेला अतिशय गांभीर्याने घेते.

काय आहे हा संपूर्ण वाद?

UK च्या अन्न सुरक्षा एजन्सी FSA ने ग्राहकांना Kinder Surprise उत्पादनांच्या विशिष्ट बॅचचा वापर टाळण्याचा सल्ला दिला. FSA ला Kinder ची खाद्य उत्पादने आणि साल्मोनेलाच्या संसर्गाचा प्रसार यांच्यातील संबंध असल्याचा संशय आहे. उत्पादन निर्माता फेरेरोने आपले एक उत्पादन आरोग्यासाठी सुरक्षित नसल्याचे लक्षात आल्यानंतर बाजारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला होता.

साल्मोनेला कसा रोखायचा?

डॉ. अशोक झिंगण यांनी सांगितले की, साल्मोनेलाचा संसर्ग कच्चे मांस, पाश्चर न केलेले दूध, अंडी, गोमांस किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तूंमधून पसरतो. याशिवाय, साल्मोनेलाचा दूषित पाणी किंवा अन्न खाल्ल्याने देखील तुम्हाला या जीवाणूचा संसर्ग होऊ शकतो. हे जीवाणू लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी अधिक धोकादायक ठरू शकतात. त्याचा संसर्ग साधारणपणे ४ ते ७ दिवस टिकतो. लक्षणांबद्दल बोलायचे झाले तर त्यात पोटदुखी, मळमळ, उलट्या, जुलाब, ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी, स्टूलमध्ये रक्त येणे यांचा समावेश होतो.


हेही वाचा : 26/11 Terrorist Attack : मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला ३१ वर्षांचा तुरुंगवास

First Published on: April 9, 2022 10:14 PM
Exit mobile version