Google Pay कडून वापरकर्त्यांना दिवाळी गिफ्ट; करावं लागेल ‘हे’ काम

Google Pay कडून वापरकर्त्यांना दिवाळी गिफ्ट; करावं लागेल ‘हे’ काम

गुगल पे द्वारे डिजिटल पेमेंट करताना काही इतर अॅप्स बंद ठेवणे आवश्यक आहे. यामधील एक म्हणजे स्क्रीन शेअरिंग अॅप. गुगल पे वापरताना स्क्रीन शेअरिंग अॅप्स बंद ठेवणं आवश्यक आहे.

Google Pay या अॅपचे अनेक वापरकर्ते आहेत. google pay वरून पेमेंट केल्यावर कंपनी त्यांच्या वापरकर्त्यांना अनेक बक्षिसे देते. अशातच Google Pay ने आपल्या वापरकर्त्यांसाठी दिवाळी ऑफर जाहीर केली आहे. त्या संदर्भात कंपनीने ट्विट करून माहिती दिली आहे.

Google India गेमच्या विजेत्याला 200 रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्यात देईल. हा गेम कसा खेळायचा हे देखील कंपनीने सांगितले आहे. हे खेळ खेळणे अगदी सोपे आहे. गुगल इंडियाचा हा गेम पे अँड सर्चद्वारे खेळत आययू शकतो.

कंपनीने ट्विट करून सांगितले आहे की हा गेम खेळण्यासाठी आणि बक्षिसे जिंकण्यासाठी, Google Pay च्या वापरकर्त्यांना अॅपमध्ये इंडी-होम चॅट हेड सुरु करावे लागेल आणि स्पर्धेत सहभागी व्हावे लागेल.

वापरकर्त्याला या खेळाच्या प्रत्येक लेव्हल साठी बक्षीससुद्धा दिले जाईल. याशिवाय, तुम्हाला QR कोड स्कॅन करून किंवा Google Pay ने बिल भरावे लागेल. तुम्हाला सर्वात मोठा दिवाळी मेळा 27 ऑक्टोबरपर्यंत करायचा आहे.

इंडी-होम स्क्रीन फक्त Google Pay अॅपवर दिसेल

तुम्हाला Google Pay अॅपवरच इंडी-होम स्क्रीन दिसेल. इंडी-होम ऑफर 27 ऑक्टोबर पर्यंतच असेल. गुगल इंडियाने असेही म्हटले आहे की टॉप 5 लाख टीमना 200 रुपयांपर्यंतची बक्षीस मिळणार आहे. 200 रुपये ही जास्तीत जास्त बक्षीस रक्कम आहे पण जरा का तुमचा ग्रुप आणेल तर तुम्ही बक्षीस जिंकू शकत नाही.

तुम्ही Google Pay वापरून कोणालाही पैसे पाठवाल तेव्हा तुम्हाला 30 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्याचबरोबर QR कोड स्कॅन करून पेमेंट केल्यावर 30 रुपये जिंकता येतात. याशिवाय तुम्ही इतर अॅक्टिव्हिटी करूनही कॅशबॅक जिंकू शकता. ही स्पर्धा चार फेऱ्यांची असेल. जसजशा फेऱ्या वाढत जातील तास हा खेळ अधिक कठीण होत जाईल.

पहिल्या फेरीत तुमचा संघ 50 रुपये जिंकू शकतो तर पहिल्या फेरीत बक्षीस रक्कम 200 रुपये ठेवण्यात आली आहे. Google Pay ने कॅशबॅक हमीबद्दल काहीही सांगितले नाही. जेव्हा कंपनी भारतात आली तेव्हा या कंपनीने तिच्या वापरकर्त्यांना मोठया प्रमाणावर कॅशबॅक दिला होता.


हे ही वाचा – डेफएक्स्पो 2022दरम्यान पंतप्रधानांकडून स्वदेशी बनावटीच्या विमानाचे अनावरण

First Published on: October 20, 2022 3:09 PM
Exit mobile version