घरदेश-विदेशडेफएक्स्पो 2022दरम्यान पंतप्रधानांकडून स्वदेशी बनावटीच्या विमानाचे अनावरण

डेफएक्स्पो 2022दरम्यान पंतप्रधानांकडून स्वदेशी बनावटीच्या विमानाचे अनावरण

Subscribe

नवी दिल्ली : गुजरातमध्ये गांधीनगर येथे सुरू असलेल्या 12व्या डेफएक्स्पो प्रदर्शनातील भारतीय पॅव्हेलियनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, बुधवारी एचटीटी-40 या स्वदेशी बनावटीच्या प्रशिक्षण देणाऱ्या विमानाचे अनावरण केले. या विमानाची संकल्पना आणि विकसन एचएएल अर्थात हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीने केले आहे.

एचटीटी-40 या विमानात अत्याधुनिक वर्तमानकालीन यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. या विमानाच्या रचनेत कंपनीने तयार केलेल्या 60 टक्के सुटेभाग तसेच काही प्रमाणात खासगी क्षेत्राच्या समन्वयातून निर्माण भागांचा वापर करण्यात आला आहे. हे विमान म्हणजे ‘आत्मनिर्भर भारता’च्या संकल्पनेचे उत्तम उदाहरण आहे. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

एचटीटी-40 हे विमान मुलभूत विमान चालन प्रशिक्षण, हवाई कसरती, विशिष्ट साधनांसह उड्डाण आणि क्लोज फॉर्मेशन उड्डाणांसाठी वापरण्यात येणार आहे. तसेच दिशादर्शन आणि रात्रीच्या वेळेतील उड्डाण करण्यासाठी दुय्यम वापराकरिता या विमानाचा उपयोग केला जाईल. भारतीय संरक्षण दलांच्या प्रशिक्षणविषयक प्राथमिक गरजा भागविण्याच्या दृष्टीने अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या विमानाची रचना करण्यात आली आहे.

टर्बो-प्रॉप इंजिन असलेल्या या विमानामध्ये अत्याधुनिक हवाई तंत्रज्ञान, चालत्या विमानात वैमानिकांची अदलाबदल, इंधन पुनर्भरण आणि अत्यंत कमी वेळात मागे फिरण्याची क्षमता अशी वैशिष्ट्ये आहेत. एचटीटी-40 या विमानाने सर्व यंत्रणाविषयक चाचण्या, सर्व प्रकारची पीएसक्यूआर कामगिरी, गरम हवामान, समुद्र पातळी तसेच क्रॉस विंड चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. सैनिकी हवाई उड्डाण योग्यता आणि प्रमाणीकरण केंद्राकडून (CEMILAC). या विमानाला परिचालनासाठी प्राथमिक परवानगी मिळाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -