गर्लफ्रेंडला पाईपावरून भेटायला जाणं एका डॉक्टरला पडले महागात!

गर्लफ्रेंडला पाईपावरून भेटायला जाणं एका डॉक्टरला पडले महागात!

Corona Crisis: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ६२४ डॉक्टरांचा मृत्यू, IMAची माहिती

मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे जिथे एका प्रतिभावान डॉक्टरला अगदी लहान वयातच जीव गमवावा लागला. हा तरुण डॉक्टर आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी तीच्या वसतिगृहात पोहोचला. तीला भेटाल्यावर परत येत असतानाच डॉक्टरचा पाय पाईपवरून घसरला आणि त्यामुळे मृत्यू ओढावला.

इंदौरच्या इंडेक्स मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडली. एक डॉक्टर आपल्या मैत्रिणीला भेटल्यानंतर परत येत असताना खाली पडला. पाईपाच्या मदतीने तो गर्ल्स हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली येत होता. दरम्यान, डॉक्टरचा पाय पाईपवरून घसरला. त्यांना तातडीने इंदूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आयुष असे या डॉक्टरचे नाव आहे. आयुष आणि त्याची मैत्रीण एकत्र एमबीबीएस शिकत होते आणि आयुष इंडेक्स हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप घेत होते. लॉकडाऊनमध्ये सवलत मिळाल्यानंतर त्याची मैत्रीण इंदूरला परतली. यानंतर तो तीला भेटण्यासाठी वसतिगृहात पोहोचला.

परिसरातील एसपी सूरज वर्मा यांनी सांगितले की, इंडेक्स मेडिकल कॉलेजचे डॉक्टर आयुष यांचे निधन झाले आहे. तो पाईपच्या सहाय्याने खाली आला होता. अधिक तपास सुरू आहे.


हे ही वाचा – कोरोनाचा कहर! जगात रूग्णांची संख्या ८० लाखांवर, साडे चार लाख लोकांचा मृत्यू!


 

First Published on: June 15, 2020 9:48 AM
Exit mobile version