Covid-19 Vaccine घेतल्यानंतर धुम्रपान करताय? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Covid-19 Vaccine घेतल्यानंतर धुम्रपान करताय? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, कोरोनापासून बचाव करण्याचा एकमात्र उपाय म्हणजे कोरोना लसीकरण. कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान, देशभरात वेगाने लसीकरण मोहीम सुरू आहे. १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींचं लसीकरण करण्याची नुकतीच केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. असे असले तरी लस घेताना अनेक जण अजूनही घाबरताना दिसताय, तर काहींच्या मनात लसीकरणासंदर्भात अनेक प्रश्न आहेत. अनेकांना मद्यप्राशन, धुम्रपान करण्याचे व्यसन असते, अशा लोकांनी कोरोनाची लस घेतल्यानंतर काय करावे? लसीकरण केल्यानंतर धुम्रपान करु शकतो का? यासंदर्भात तज्ज्ञांचं मत काय? लसीकरणानंतर धुम्रपान करणं योग्य आहे? जाणून घ्या…

ज्या व्यक्तींना धुम्रपान करण्याचं व्यसन आहे, त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी लवकर कोरोनाची लस घ्यावी. धुम्रपान केल्याने फुफ्फुसांची आरोग्याला धोका निर्माण होतो. तसेच सतत धुम्रपान केल्याने रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होतो. तसेच श्वसनाचे आजार जडण्याचाही धोका वाढतो. अनेक संशोधनातून निष्कर्ष काढण्यात आला आहे की, धुम्रपान करणाऱ्यांना कोरोनाच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर विशाखा यांनी सोशल मीडियावर लसीकरणानंतर काय करावं? काय करु नये? यांदर्भातील काही सूचना दिल्या आहेत.कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर नागरिकांनी धुम्रपान करणं टाळलं पाहिजे, कारण यामुळे लसीकरणामुळे शरीरात तयार होणाऱ्या अँटिबॉडीजचा रिस्पॉन्स कमी होतो, असे त्यांनी म्हटले आहे.

First Published on: May 3, 2021 3:50 PM
Exit mobile version