काश्मीर मुद्द्यावरील भारतविरोधी सोशल मीडिया पोस्टनंतर Maruti Suzuki आणि Domino’s ने मागितली माफी

काश्मीर मुद्द्यावरील भारतविरोधी सोशल मीडिया पोस्टनंतर Maruti Suzuki आणि  Domino’s ने मागितली माफी

काश्मीर मुद्द्यावरील भारतविरोधी सोशल मीडिया पोस्टनंतर Maruti Suzuki आणि Domino’s ने मागितली माफी

काश्मीर मुद्द्यावरून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी KFC पाकिस्तानने जाहीर मागितली आहे. KFC व्यतिरिक्त आता Domino’s ने देखील Twitter वर खुलासा केला आहे. सोशल मीडियावर काही दिवसांपासून डोमिनोज पाकिस्तानची एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी काश्मीरच्या पाठीशी उभे असल्याचे म्हणत वेगळं राष्ट्र निर्माण करण्यासंदर्भात भाष्य केलं होतं. ही पोस्ट 5 फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. ज्याच्या एक दिवस आदी पाकिस्तानमध्ये काश्मीर एकता दिवस पाळला जातो.

डॉमिनोजने वाद उफाळून आल्यानंतर अखेर ती पोस्ट डिलीट केली. पण त्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. #BoycottDominos असा ट्रेंड ट्विटरवर करू लागले. डॉमिनोज पाकिस्तानने पोस्ट करत लिहिले होते की, ‘आपला देश काश्मिरींच्या समर्थनार्थ एक आहे, तो लवकरच स्वतंत्र राष्ट्र बनेल. काश्मिरींच्या बाजूने उभे राहूया.

यानंतर डॉमिनोज इंडियाने ट्विटरवर एक पोस्ट करत स्पष्टीकरण देत म्हटले की, 25 वर्षांपासून हा देश आमचे घर आहे. त्याची आम्हाला नेहमीच मदत झाली आहे. आम्ही या देशाचा आदर करतो.

पिझ्झा हट आणि मारुती सुझुकीनेही केला खुलासा

Domino’s व्यतिरिक्त KFC India, Maruti Suzuki, Hyundai Motor India, Kia Motors आणि Pizza Hut यांनीही एक निवेदन जारी केले. मारुती सुझुकीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “सुझुकी मोटरकॉर्पची जगभरात विश्वासार्हता आहे. आपली नैतिक आणि सामाजिक जबाबदारी समजून आम्ही शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करतो.

केएफसीने देखील 5 फेब्रुवारीला काश्मीरबद्दल वादग्रस्त पोस्टही लिहिली होती. मात्र यानंतर ती पोस्ट हटवण्यात आली आहे. तसेच त्यांनी ट्विटरवर माफीनामाही पोस्ट केला आहे.

पिझ्झा हटच्या पाकिस्तानी हँडलवरून काश्मीरबद्दलही अशीच पोस्ट करण्यात आली होती. याशिवाय कोरियाच्या ह्युंदाई आणि किया मोटर्सच्या पाकिस्तानी सोशल मीडिया हँडलनेही काश्मीरबद्दल आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या होत्या. त्यानंतर सोशल मीडियावर वादाविवाद सुरु झाले. या दोन्ही कंपन्यांनी स्वतंत्र निवेदने जारी करून स्पष्टीकरणही दिले असून कंपनीशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.


Karnataka Hijab Row : ‘अल्ला हु अकबर’चा नारा देणाऱ्या ‘त्या’ विद्यार्थिनीला जमियत संघटनेकडून ५ लाखांचे बक्षीस


First Published on: February 9, 2022 1:58 PM
Exit mobile version