Coronavirus: अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेशी तोडले संबंध!

Coronavirus: अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेशी तोडले संबंध!

Coronavirus: अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेशी तोडले संबंध!

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा सर्वात जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जागतिक आरोग्य संघटनेवर आणि चीन सातत्याने आरोप करताना दिसत आहे. आता अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेशी सर्व तोडले असल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘जागतिक आरोग्य संघटना ही चीनच्या इशाऱ्यावर चालत आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटना सुधारणा करण्यात अयशस्वी ठरली आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांच्याशी असलेले सर्व संबंध तोडत आहोत.’

ट्रम्प पुढे म्हणाले की, ‘चीन केवळ वर्षाला ४० दशलक्ष डॉलर्सची मदत करूनही जागतिक आरोग्य संघटनेवर चीनचे वर्चस्व आहे. त्याच्या तुलनेत अमेरिकेकडून ४५० दशलक्ष डॉलर्सची मदत करूनही आमचे काही ऐकले जात नाही.’ तसेच जागतिक आरोग्य संघटनेला सुधारणा करण्यास सांगितले असूनही त्यांनी काही केलेले नाही म्हणून अमेरिका त्यांच्याशी सर्व संबंध तोडत आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

चीनने वुहान शहरातील कोरोना विषाणूची माहिती लपवल्यामुळेच तो जगभरात पसरला. यामुळे जगभरात तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तसेच चिनी अधिकाऱ्यांनी जागतिक आरोग्य संघटनेपासून अनेक प्रकारची माहिती लपवली आहे, असे ट्रम्प म्हणाले.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचाकांना एक पत्र देखील लिहिले होते. येत्या ३० दिवसांत संघटनेत सुधारणा करा नाहीतर तुमचा निधी कायमचा बंद करू असा पत्राद्वारे जागातिक आरोग्य संघटनेला ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे.


हेही वाचा – Coronavirus: WHO सर्व सामान्य लोकांकडून देखील घेणार निधी!


 

First Published on: May 30, 2020 9:27 AM
Exit mobile version