आता अमेरिकेतही TikTok सह ‘या’ App वर बंदी

आता अमेरिकेतही TikTok सह ‘या’ App वर बंदी

Tik Tokयुझर्सच्या अपेक्षा धुळीला, भारताचा टिक टॉकला कायमचा बाय बाय

भारतात चीनी मोबाईल अॅप्सना बंदी आणल्यानंतर अमेरिकेतही रविवारपासून TikTok, WeChat हे मोबाईल app च्या संचालनावर बंदी घालण्यात येणार आहे. ट्रम्प सरकारने यासाठी एक आदेश जारी केला आहे, अशी माहिती वृत्तसंस्था एएफपीने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टिकटॉक व्यतिरिक्त, व्ही चॅटही रविवारपासून अमेरिकेत डाउनलोड करता येणार नाही. अमेरिकेत टिकटॉकचे साधारण १० कोटी युजर्स आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच भारतानेही टिकटॉकवर बंदी घातली होती.

भारत चीनच्या सीमेवरील ताण-तणावादरम्यान हा मोठा निर्णय घेण्यात आला. भारतात ५९ चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. ज्या अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे त्यापैकी टिकटॉक, यूसी ब्राउजर, शेयर इट यासारखे बरेच चीनी अॅप्स आहेत. याशिवाय हॅलो, लाइक, कॅम स्कॅनर, शीन क्वाई, बॅटरी स्कॅनरवर देखील बंदी घातली आहे. सरकारने आयटी अ‍ॅक्ट २००० अंतर्गत या चिनी अॅप्सवर बंदी घातली असल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी चिनी अ‍ॅपची एक यादी तयार केली होती आणि केंद्र सरकारने त्यांना बंदी घालावी, असे आवाहन केले आहे. तसेच चीन भारतीय डेटा हॅक करू या कारणामुळे लोकांना त्वरित त्यांच्या मोबाइलवरून काढण्यास सांगितले पाहिजे, असे देखील सांगण्यात आले होते.


Corona Vaccine येवो वा न येवो, या महिन्यापर्यंत सगळं सुरळीत होणार! AIIMS मधून पुष्टी!
First Published on: September 18, 2020 7:01 PM
Exit mobile version