CoronaVirus: वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनावर लस येईल – डोनाल्ड ट्रम्प

CoronaVirus: वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनावर लस येईल – डोनाल्ड ट्रम्प

कोरोनाचा हाहाकार सर्वात जास्त अमेरिकेत पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या असो वा मृत्यूचा आकडा हा इतर देशांपेक्षा अमेरिकेत जास्त आहे. अशावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वर्ष संपेपर्यंत कोरोनावरील लस येईल, असे वक्तव्य केले आहे. अशी माहिती एएफपी या न्यूज एजन्सीमार्फत दिली केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी दावा केला होता की कोरोना विषाणूची उत्पत्ती ही चीनच्या वुहान शहरातील लॅबमध्ये झाली असून त्यांच्याकडे तसे पुरावे आहे. चीनच्या विरोधात असलेल्या पोम्पिया यांनी याचा उल्लेख केला नाही की, चीन या आरोपाचे खंडन करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोरोना संसर्गाबाबत चीनवर चांगलेच आक्रमक झाले आहेत. यासाठी त्यांनी चीनला बेजबाबदार ठरवत चीनने स्पष्टीकण देण्याची मागणी यापूर्वी अनेकदा केली आहे.

अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण 

सध्याच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत ९ लाख ४१ हजार २२५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत ६८ हजार ६०२ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १ लाख ७८ हजार ५९४ कोरोनाबाधित बरे होऊ त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच जगभरात सध्या कोरोनाबाधितांची संख्या २१ लाख ७३ हजार ८१५ इतकी झाली असून मृतांचा आकडा २ लाख ४८ हजार ५५५ इतका आहे. तर ११ लाख ५९ हजार ५०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 हेही वााचा –

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर अनेक देशात कोरोना वेगात पसरला

First Published on: May 4, 2020 2:24 PM
Exit mobile version