WHOने कोरोना लसीबाबत केलं मोठं विधान, म्हणाले…

WHOने कोरोना लसीबाबत केलं मोठं विधान, म्हणाले…

WHOने कोरोना लसीबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. जगातील कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी ५३ लाखांहून अधिक आहे. दरम्यान एकीकडे कोरोना मात करण्यासाठी ऑक्सफर्डची लस यशस्वी होत आहे. नोव्हेंबर पर्यंत ऑक्सफर्डची ही लस बाजारात येईल असे सांगितले जात आहे. पण दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने लसीबाबत एक मोठे विधान केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांनी सांगितले आहे की, ‘कोरोना लसीचा वापर २०२१च्या आधी होईल अशी अपेक्षा करू नका.’ याबाबत वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन संचालक डॉक्टर माइक रायन यांनी सांगितले की, ‘योग्य लस बाजारात आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना प्रयत्न करत आहे. यादरम्यान जगात कोरोना रुग्णसंख्येत नवे विक्रम होत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे खूप महत्त्वाचे आहे. सध्या लस निर्मितीत आपण चांगली प्रगती करत आहोत. अनेक लसी तिसऱ्या टप्प्यात असून सुरक्षा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने आतापर्यंत कोणालाही अपयश आलेले नाही. पण जरी लस तयार झाली तरी ती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी २०२१ची वाट पाहावी लागणार आहे.’

‘जागतिक आरोग्य संघटना योग्य लस उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे. शिवाय लस निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हावी याकडे जागतिक आरोग्य संघटना लक्ष ठेऊन आहे. जगाच्या हितासाठी हे असल्याने आपल्याला प्रामाणिक असले पाहिजे. फक्त श्रीमंत आणि गरीबांसाठी कोरोनाची लस नसून ती प्रत्येकासाठी असणार आहे’, असे रायन यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – चिंताजनक! जगातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!


 

First Published on: July 23, 2020 9:32 AM
Exit mobile version