येत्या पाच वर्षातील महामारीसाठी प्रोटोटाईप वॅक्सिन, अमेरिकेची तयारी सुरू

येत्या पाच वर्षातील महामारीसाठी प्रोटोटाईप वॅक्सिन, अमेरिकेची तयारी सुरू

येत्या काळातील संभाव्य महामारीसाठी आता अमेरिकेने तयारी सुरू केली आहे. लासा फिव्हर, इबोला किंवा निपाह व्हायरसपासूनच्या महामारीचा संभाव्य धोका ओळखूनच अमेरिकेने यासारख्या महामारीचा प्लॅन तयार करण्यासाठी सुरूवात केली आहे. आगामी पाच वर्षांमध्ये येणाऱ्या संभाव्य महामारीची तयारी अमेरिकेने करायला सुरूवात केली आहे. हा प्लॅन महत्वकांशी आणि खर्चाचा असा आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात असे अब्जावधी डॉलर्स लागणार आहेत. तसेच काही वर्षांचीही ही गुंतवणुक असेल असे अपेक्षित आहे. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात वैज्ञानिकांचे योगदानही यासाठी महत्वाचे ठरणार आहे. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एलर्जी एण्ड इन्फेक्शिशिअस डिझिजचे डॉ एंथनी फौची यांनी हा पाच वर्षांतील संभाव्य महामारी ओळखून प्लॅन तयार केला आहे. या महत्वकांशी योजनेची फळे मिळण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागू शकतो असे फौची यांचे मत आहे. द न्यू यॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत डॉ फौची यांनी आपले मत मांडले आहे.

काय आहे नेमका प्लॅन ?

या प्लॅनमध्ये वॅक्सिनचा प्रोटोटाईप तयार करण्याची योजना आहे. व्हायरसच्या एकुण २० फॅमिलिजपासून बचाव करण्यासाठीची ही योजना असणार आहे. संभाव्य अशा व्हायरस फॅमिलीपासून महामारी येऊ नये म्हणूनच अमेरिकेकडून ही तयारी सुरू करण्यात आली आहे. covid-19 व्हायरसविरोधात यशस्वी ठरलेल्या रिसर्च टूल्सचा वापर करून प्रत्येक व्हायरसचे मॉलेक्युलर स्ट्रक्चर अभ्यासण्यात येणार आहे. त्यामध्ये एण्टीबॉडिजला कोणत्या पद्धतीने हानी होऊ शकते. तसेच एण्टीबॉडिज कशा पद्धतीने काम करू शकतात याचा अभ्यास या संशोधनातून होणार आहे.

जर आम्हाला या संशोधनासाठी निधी मिळाला तर या लसीसाठीचे काम हे २०२२ मध्ये सुरू होऊ शकते असा विश्वास फौची यांनी व्यक्त केला आहे. सध्या योजनेसाठीची चर्चा ही व्हाईट हाऊस आणि इतर संलग्न संस्थांशी सुरू आहे. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या डॉ फ्रान्सिस कॉलिन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार या संपुर्ण प्रकल्पासाठीचा निधी पुरवण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या संपुर्ण प्रकल्पासाठी आर्थिक आधार हा डॉ फौची इन्स्टिट्यूटमधून येऊ शकेल. पण जो काही अतिरिक्त निधी लागेल तो कॉंग्रेसमार्फत देण्यात येईल. यंदाच्या वर्षीचे डॉ फौची इन्स्टिट्यूटचे बजेट हे ६ बिलिअन डॉलर्स इतके होते. डॉ फौची यांनी या संपुर्ण प्रकल्पासाठी एकुण किती निधी लागेल याबाबतची माहिती स्पष्ट केलेली नाही.

प्रोटोटाईप वॅक्सिन हा प्रकल्प डॉ बार्ने ग्रॅहम यांच्या संकल्पनेतून पुढे आलेला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एलर्जी एण्ड इन्फेक्शिअस डिझिजचे डॉ ग्रॅहम हे उपमहासंचालक आहेत. त्यांनी फेब्रुवारी २०१७ मध्ये ही प्रोटोटाईप वॅक्सिनची संकल्पना मांडली होती. इन्स्टिट्यूटच्या संचालकांच्या एका बैठकीत त्यांनी ही संकल्पना मांडली होती. एका पाठोपाठ एक अशा पद्धतीने व्हारसचे रूपांतर हे महामारीत झाले आहे. आतापर्यंत H1N1 स्वाईन फ्लू २००९, चिकुनगुनया २०१२, MERS २०१३, इबोला २०१४, झिका २०१६ यासारख्या व्हायरसमुळे याआधीही आजाराचे रूपांतर हे महामारीत झाले. प्रत्येक महामारीनंतर वैज्ञानिकांनी लस निर्मितीसाठी पुढाकार घेतला. पण अशा लसींचा परिणाम हा तितक्या कालावधीसाठीच होता. या व्हायरसच्या स्ट्रेनवर या लसी परिणामकारक ठरल्या नाहीत. इबोलावर लस प्रभावी ठरलेली असली तरीही इबोलाच्या स्ट्रेनवर ठरलेली नाही यासारखीही उदाहरणे आहेत. पण आता लस तयार करून खूपच थकवा आला आहे असे डॉ ग्रॅहम यांचे मत आहे.

संशोधकांनी गेल्या दशकात तयार केलेल्या टूल्समुळे नक्कीच मोठा बदल घडू शकतो असे डॉ ग्रॅहम यांचे म्हणणे आहे. वैज्ञानिकांना दिलेल्या सवलतीनुसार व्हायरसचे मॉलेक्युलर स्ट्रक्चर अभ्यासणे शक्य आहे. त्यामुळे ज्या अॅण्टीबॉडिज व्हायरसला ब्लॉक करतात अशा अॅण्टीबॉडिजला आयसोलेट करणेही शक्य होते. स्ट्रक्चर बेस डिझाईनच्या माध्यमातून ही नवीन लस निर्मिती असेल असेही डॉ ग्रॅहम यांनी स्पष्ट केले आहे. म्हणूनच डॉ फौची यांनी मांडलेल्या मतानुसार आगामी काळात महामारीसाठीची तयारी करणे ही गरजेची असणार आहे. त्यासाठीच येत्या पाच वर्षांमध्ये व्हायरसच्या फॅमिलिजमध्ये २० पैकी १० व्हायरसच्या फॅमिलिचा प्रोटोटाईप तयार करणे गरजेचे असल्याचे मत फौची यांनी मांडले आहे. पण या सगळ्या संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासणार आहे, असेही मत त्यांनी मांडले आहे.


 

First Published on: July 26, 2021 1:06 PM
Exit mobile version