अमेरिकेसारखीच फास्ट ट्रॅकवर लसीकरण मोहीम राबविण्याची भारताला गरज – डॉ. शशांक जोशी

अमेरिकेसारखीच फास्ट ट्रॅकवर लसीकरण मोहीम राबविण्याची भारताला गरज – डॉ. शशांक जोशी

अमेरिकेसारखीच फास्ट ट्रॅकवर लसीकरण मोहीम राबविण्याची भारताला गरज - डॉ. शशांक जोशी

देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. या लाटेचा तडाखा जोरदार बसला आहे. कोरोनानिरुद्धच्या लढाईत महत्त्वाची असलेली लसीकरण मोहीम देशात धिम्या गतीने सुरु आहे. कोरोनाची लाट थोपवायची असेल तर लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. अमेरिकेसारखीच फास्ट ट्रॅकवर लसीकरण मोहीम राबविण्याची भारताला गरज आहे, असं महाराष्ट्रच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी म्हटलं आहे.

टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी ट्विट करत अमेरिकेसारखीच फास्ट ट्रॅकवर लसीकरण मोहीम राबविण्याची भारताला गरज असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेत चौथी लाट सध्या सुरू आहे. अमेरिकेत दुसर्‍या आणि तिसर्‍या लाटेनेही उच्चांक गाठला होता. पण मोठ्या प्रमाणात झालेल्या लसीकरणामुळेच लाट थोपवण्यात अमेरिकेला यश आलं. म्हणूनच भारतातही डबल मास्क आणि लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांना लस देण्याची मोहीम फास्ट ट्रॅकवर राबवण्याची गरज आहे, असं डॉ. शशांक जोशी यांनी म्हटलं आहे.

भारतात १४ कोटी जणांचं लसीकरण

भारतात लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. भारतात आतपर्यंत १४ कोटी ५२ लाख ७१ हजार १८६ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. भारतातील अनेक राज्यात लसीचा तुटवडा जाणवू लागला. यामुळे अनेक वेळा अनेक लसीकरण केंद्र ही बंद आहेत. दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत ३ लाख २३ हजार १४४ नवे रुग्ण आढळले आहेत. २ हजार ७७१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ५१ हजार ८२७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

First Published on: April 27, 2021 10:10 AM
Exit mobile version