राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी द्रौपदी मुर्मू आज अर्ज दाखल करणार

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी द्रौपदी मुर्मू आज अर्ज दाखल करणार

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची १८ जुलै रोजी बैठक पार पडणार आहे. तर निवडणुकीचा निकाल २१ जुलै रोजी जाहीर होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नाव घेण्यात येत होते. मात्र, आता राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी द्रौपदी मुर्मू आज अर्ज दाखल करणार आहेत.

झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी काल त्यांच्या मूळ राज्य ओडिसा भुवनेश्वरहून दिल्लीत आल्या होत्या. तसेच त्या आज आपला उमेदवारी दाखल करणार आहेत. पण यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. द्रौपदी मुर्मू आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा या नेत्यांच्या उपस्थितीत आज दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

बीजेडीने मुर्मू यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. तर मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी तयार करण्यात येत आहे. तर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रस्तावक आणि समर्थक म्हणून स्वाक्षऱ्या करत आहेत.

राष्ट्रपतीच्या उमेदवारासाठी विरोधी पक्षाने एकजूट करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी १५ जून रोजी दिल्लीत देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक बोलावली होती. पण या बैठकीत आम आदमी पार्टी, तेलंगनाची टीआरएस आणि ओडिसाची बीजेडी तसेच, आंध्र प्रदेश वाईएसआर काँग्रेस आदी पक्ष सामिल झाले नाहीत. दरम्यान, शरद पवार यांनी नकार दिल्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांचं नाव चर्चेत आलं होतं. मात्र, त्यांनीही हा प्रस्ताव फेटाळला.


हेही वाचा : देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा; राष्ट्रपतींनी केली


 

First Published on: June 24, 2022 2:27 PM
Exit mobile version