नाश्त्यात रोज दूध प्यायल्यास, होतो मधुमेह कमी

नाश्त्यात रोज दूध प्यायल्यास, होतो मधुमेह कमी

प्रातिनिधिक फोटो

रोज सकाळी नाश्ता करणं खूप गरजेचं असतं. नाश्त्यात उच्च प्रोटीन असलेलं दूध पिण्यामुळं मधुमेह असणाऱ्या रुग्णांना रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते. कॅनडामधील युनिव्हर्सिटी ऑफ ग्वेल्फ आणि युनिव्हर्सिटी ऑफ टोरँटोमध्ये तपासामध्ये नाश्त्यातील बदलामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते असं सिद्ध झालं आहे. तपासात नाश्ता करताना दूध प्यायल्यास नंतर रक्तातील ग्लुकोजची मात्रा कमी झाल्याचं आढळल्याचं सिद्ध झालं आहे. तसेच उच्च प्रोटीन असणारे दूध हे सामान्य प्रोटीनच्या डेअरी उत्पादनातील ग्लुकोजच्या तुलनेत जास्त पोषक असून त्यामध्ये ग्लुकोजची मात्रा कमी असल्याचंही आढळलं आहे.

दुधामध्ये साखर नियंत्रित करण्याची ताकद

‘जर्नल ऑफ डेअरी सायन्स’ मध्ये प्रकाशित करण्यात आल्याप्रमाणे नाश्त्याच्या वेळी दूध पिण्याचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. तसंच यामुळं कार्बोहायड्रेट्सचं पचन हळूहळू होतं आणि रक्तामधील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत मिळते. पोषण विशेतज्ज्ञ हे नेहमीच पोषक तत्त्व असणारा नाश्ता खाण्यासाठी सांगतात, तसंच नाश्त्यात दुधाचा समावेश करण्यात यावा हेदेखील आधीपासून सांगण्यात आल्याचंही यामधून स्पष्ट करण्यात आलं आहे. दुधासह रोज आंबा खाल्ल्यामुळंही तुमचं आरोग्य योग्य राखण्यास मदत करतो हे सिद्ध झालं आहे. जाड्या व्यक्तींनी रोज आंब्याचं सेवन केल्यास, त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते, असंही या अभ्यासातून सिद्ध करण्यात आलं आहे. दरम्यान ओकलाहोमा स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ ह्यूमन सायन्समधील प्रोफेसर एड्रालिन लुकासच्या निष्कर्षानुसार, जाड्या व्यक्तींनी रोज साधारण १०० ग्रॅम आंबा रोज खाल्ल्यास, त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होईल असं सांगितलं आहे. यामधील फायबर रक्तातील साखरेची पातळी कमी करते असंही त्यानं स्पष्ट केलं आहे.

First Published on: August 21, 2018 6:33 PM
Exit mobile version