LockDown: मुंबईहून उत्तर प्रदेशला चालत गेला..पण क्वॉरंटाईन केल्यानंतर ६ तासांत झाला मृत्यू!

LockDown: मुंबईहून उत्तर प्रदेशला चालत गेला..पण क्वॉरंटाईन केल्यानंतर ६ तासांत झाला मृत्यू!

प्रातिनिधिक छायाचित्र

देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊन दरम्यान  आपल्या घरी जाण्यासाठी चालत, पोहत जाण्याच्या घटना घडल्या आहेत. अशी घटना घडल्याचे पुन्हा समोर आलं आहे. लॉकडाऊन दरम्यान एक तरुण मुंबई पासून तब्बल १६०० किलोमीटर लांब उत्तर प्रदेशमधील श्रीवस्ती जिल्हात चालत पोहोचला. त्यानंतर तिथून देखील गावापर्यंत त्याने चालत प्रवास केला. पण तिथल्या प्रशासनाने त्याला गावात पोहोचल्या एका शाळेत १४ दिवसांसाठी क्वॉरंटाईनमध्ये ठेवलं. मात्र क्वॉरंटाईन केल्यानंतर त्याचा ६ तासांत मृत्यू झाला.

महाराष्ट्रातून हा तरुण लपत-छपत उत्तर प्रदेशमधील श्रावस्ती जिल्ह्यातील मल्हीपूर येथील मठखनवा गावात सोमवारी पोहोचला. मात्र त्यांचा मृत्यू झाला. या तरुणाला गावात पोहोचल्यानंतर एका शाळेत १४ दिवसांसाठी क्वॉरंटाईन करण्यात आलं होत. परंतु १४ दिवस तो क्वॉरंटाईनमध्ये जगू शकला नाही. मुंबईतून १६०० किलोमीटर चालत पार करून तो सोमवारी सकाळी ७ वाजता आपल्या गावात पोहोचला. सोमवारी १ वाजल्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. आरोग्य विभाग आणि पोलीस विभागचे उच्च अधिकाऱ्यांना कोरोना प्रोटोकॉलच्या अंतर्गत मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे.

दरम्यान मृतदेहाजवळ गेलेल्या कुटुंबातील सदस्यांना त्याच शाळेत क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. मृत तरुणांच्या कुटुंबाचा असा दावा आहे की, ज्याप्रमाणे त्याच्या शरीराची अवस्था झाली होती. त्यामुळेच त्याला चालत एवढ्या लांब यावं लागलं. मृत्यू कशामुळे झाला आहे याबाबत अद्याप स्पष्ट झालं नाही आहे.


हेही वाचा – Video: कोणीही मुस्लिमांकडून भाजी खरेदी करू नका – भाजप आमदार


 

First Published on: April 28, 2020 3:16 PM
Exit mobile version