LockDwon: आज देशभरात सोशल डिस्टन्सिंगने साजरी होतेय ईद-उल-फित्र!

LockDwon: आज देशभरात सोशल डिस्टन्सिंगने साजरी होतेय ईद-उल-फित्र!

प्रातिनिधीक फोटो

इस्लामिक कॅलेंडरच्या शव्वाल महिन्याची सुरुवात ईद-उल-फितरपासून होते. इस्लामिक कॅलेंडरचा हा दहावा महिना आहे. ईदचा दिवस हा एकमेव असा दिवस असतो ज्यादिवशी उपवास पाळला जात नाही. ईदच्या महिन्यानंतर म्हणजे ईश्वर शव्वाल महिना सुरू होता आणि ईद साजरी केली जाते, म्हणून तिच्या तारखा जगभरात वेगवेगळ्या असल्याचे दिसते. भारतात २४ मे रोजी ईदचा चंद्र दिसल्यानंतर संपूर्ण देशात ईदचा सण आज साजरा होतोय तर सौदी अरेबिया, युएईसह सर्व आखाती देशांमध्ये ईदचा चंद्र २३ मे रोजी दिसला, त्यानंतर ईद २४ मे रोजी साजरी करण्यात आली.

रविवारी, रमजान उल मुबारक महिन्याचा ३० वा रोजा रोजेदारांनी पूर्ण केला. त्याचबरोबर ईदचा चंद्रही दिसला. दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी सांगितले की, ईदचा चंद्र दिसला असून ईद-उल-फितर २५ मे रोजी देशभरात साजरा केली जात आहे. तर केरळ आणि जम्मू-काश्मीर इथे शनिवारी ईद साजरी करण्यात आली.

सोशल डिस्टन्सिंगने साजरी होतेय ईद

संपुर्ण देशात कोरोनाचा कहर असल्याने संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आहे, त्यामुळे धार्मिक स्थळं देखील बंद करण्यात आल्याने ईदच्या दिवशी मुस्लीम बांधवांनी त्यांच्या घरातच नमाज अदा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासह एकमेकांना ईदच्या निमित्ताने गळाभेट देऊ नका आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शुभेच्छा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

…म्हणून मीठी ईद म्हटले जाते

रोजानंतर ईद-उल-फितरला पहिल्यांदाच गोड पदार्थ खाऊन रोजा सोडतात. तसेच, मिठाई, आणि शीर खुर्मा सगळ्यांना वाटून खातात, त्यामुळे ईद-उल-फित्रला मीठी ईद असेही म्हटले जाते.

मशिदीमध्ये केवळ ५ लोकांचाच नमाज अदा

ईदच्या निमित्ताने मुस्लिम समुदायाचे लोक जमातबरोबर नमाज पठवणार नाहीत, असे महाराष्ट्राचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले असून मशिदी आणि ईदगाहमध्ये केवळ ५ लोक नमाज अदा करतील असंही त्यांनी सांगितले.


वैमानिकाच्या ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानमध्ये विमानाचा झाला मोठा अपघात!
First Published on: May 25, 2020 11:44 AM
Exit mobile version