तुर्कीकडून इराकच्या कुर्दिस्तानमध्ये बॉम्बहल्ला; 8 जणांचा मृत्यू, 23 जखमी

तुर्कीकडून इराकच्या कुर्दिस्तानमध्ये बॉम्बहल्ला; 8 जणांचा मृत्यू, 23 जखमी

इराकच्या कुर्दिस्तानात तुर्कीकडून होत असलेल्या हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही, यात तुर्कीने पुन्हा उत्तर इराकच्या कुर्द बहुल परिसरात भीषण बॉम्बहल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात 8 नागरिकांचा मृत्यू झाला असून 23 नागरिक जखमी झाले आहेत.

उत्तर इराच्या दोहुक प्रांतात हा हल्ला झाला आहे. इराक मीडियाच्या माहितीनुसार, तुर्कीच्या अगदी मध्य सीमेवर असलेल्या जाखो शहरातील एका रिसॉर्टवर भीषण बॉम्बहल्ला झाला. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले सर्व नागरिक हे टूरिस्ट असल्याची माहिती समोर येत आहे. तुर्कीकडून सातत्याने उत्तर इराकवर हवाई हल्ले केले जात आहेत. तुर्की इराकच्या कुर्द सैनिकांना दहशतवादी म्हणत हल्ले करत आहे.

दहशतवादी म्हणून हल्ले करत आहे. त्याच वेळी, कुर्द तुर्कस्तानच्या कारवाईच्या निषेधार्थ कमांडो पाठवून प्रत्युत्तर देतात. पीकेके या कुर्दिश लढवय्या संघटनेने 1984 पासून तुर्कस्तानविरुद्ध शस्त्रे हाती घेतली आहेत. या संघर्षात आतापर्यंत 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

इराकच्या परराष्ट्रमंत्र्यांनी घटनास्थळी दिली भेट 

तुर्कीच्या या हल्ल्यानंतर इराकचे परराष्ट्र मंत्री फुआद हुसेन यांनी हल्ला झालेल्या भागाला भेट दिली आहे. ते म्हणाले की इराकमध्ये आधीच अनेक मोठ्या समस्या आहेत, सध्या सुरक्षित पर्यटन क्षेत्रावर बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटनावर परिणाम झाला आहे.

या हल्लानंतर अमेरिकेच्या बाजूने एक निवेदनही जारी करण्यात आले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितले की, आमच्याकडे उत्तर इराकमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांची माहिती आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.


जो डर गया वो मर गया, सत्तासंघर्षात राऊतांचं नवं ट्वीट


First Published on: July 21, 2022 10:26 AM
Exit mobile version