सुशील चंद्रा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त; मंगळवारपासून सांभाळणार पदाची जबाबदारी

सुशील चंद्रा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त; मंगळवारपासून सांभाळणार पदाची जबाबदारी

सुशील चंद्रा

भारताचे नवनियुक्त निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा हे होणार असून सध्या ते निवडणूक आयुक्तपदावर कार्यरत आहेत. ते मंगळवारपासून या पदाची जबाबदारी सांभाळणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याच्या परंपरेनुसार सुशील चंद्रा हे नवे मुख्य निवडणूक आयुक्त होणार आहेत. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्यासह चंद्रा हे निवडणूक आयोगाचे कामकाज पाहणार आहेत. पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंडमध्ये होणाऱ्या निवडणुकांची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

सुशील चंद्रा यांच्या नावावरही सरकारकडून शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. चंद्रा यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी निवडणूक आयुक्त करण्यात आले होते. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरो त्याच दिवशी सेवानिवृत्त होत असल्याने ते १३ एप्रिल रोजी पदभार स्वीकारतील. सुशील चंद्रा हे १४ मे २०२२ पर्यंत या पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. निवडणूक आयोगात येण्यापूर्वी ते केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष होते.

पुढील वर्षी पाच विधानसभेच्या निवडणुका

नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी मार्चमध्ये होणार आहेत. उत्तरप्रदेश वगळता उर्वरित विधानसभा निवडणुकांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपणार आहे तर उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ १४ मे रोजी संपणार आहे.


First Published on: April 12, 2021 12:06 PM
Exit mobile version