ट्विटरचे ‘ब्लू टिक’ दरमहा आठ डॉलरला; एलॉन मस्कची घोषणा

ट्विटरचे ‘ब्लू टिक’ दरमहा आठ डॉलरला; एलॉन मस्कची घोषणा

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी आपल्याकडे घेतल्यानंतर त्यामध्ये अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यामधील सर्वाधिक मोठा म्हणजे ‘ब्लू टिक’ सबस्क्रिप्शन. कारण आता ‘ब्लू टिक’ सबस्क्रिप्शनसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यानुसार, आठ डॉलर म्हणजेच अंदाजे 661 रुपये दरमहा मोजावे लागणार आहेत. (elon musk announced 8 dollars charges for twitter account verification and blue tick)

एलॉन मस्क यांनी मंगळवारी ‘ट्विटर ब्लू’च्या नव्या व्हर्जनची घोषणा केली. ज्यामध्ये ट्विटरच्या पोस्ट्सना रिप्लाय देणे, उल्लेख करणे आणि सर्च करण्यात प्राधान्यासोबत ट्विटरच्या सबस्क्रिप्शन सेवेला दरमहा 8 डॉलर्स आकारण्याची त्यांची योजना आहे. तसेच, प्रत्येक देशाच्या खरेदी क्षमतेनुसार या फीमध्ये बदल होईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे.

‘ब्लू टिक’ सबस्क्रिप्शननंतर कंपनीकडून अक्षरमर्यादेत मोठा बदल केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या ट्विटरवर 280 शब्दांची मर्यादा आहे. ‘कंटेंट मॉडरेशन’ धोरणाचे पुनरावलोकन करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय मस्क यांनी घेतला आहे.


हेही वाचा – उत्तर कोरियाने 10 क्षेपणास्त्रांचा मारा केल्यानंतर दक्षिण कोरियाने दिला हवाई हल्ल्याचा इशारा

First Published on: November 2, 2022 11:42 AM
Exit mobile version