Twitterची सूत्रं महिलेच्या हाती, Elon Musk देणार सीईओपदाचा राजीनामा

Twitterची सूत्रं महिलेच्या हाती, Elon Musk देणार सीईओपदाचा राजीनामा

एलन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यापासून हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कायमच चर्चेत राहिलेले आहे. मस्क हे सीईओ झाल्यापासून त्यांनी ट्वीटरमध्ये अनेक बदल केलेले आहेत. आता आणखी एक मोठा बदल ट्विटरमध्ये लवकरच पाहायला मिळणार आहे. ट्विटरच्या सीईओ पदाचा एलन मस्क हे लवकरच राजीनामा देणार आहेत. (Elon Musk resigns as Twitter CEO) या जागी एका महिलेची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबाबतची माहिती स्वतः मस्क यांनी दिलेली आहे. मस्क यांनी या महिलेच्या नावाची घोषणा केलेली नसली तरी एक महिला सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आल्याचे मस्क यांनी सांगितले आहे. गुरूवारी (ता. 11 मे) रात्री त्यांनी याबाबतची घोषणा केली.

हेही वाचा – अहमदाबादमध्ये तीन मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखालून 3 जणांची सुखरूप सुटका

एलन मस्क यांनी ट्वीट करत सांगितले की, “ट्विटरसाठी नव्या सीईओंची निवड केल्याचं जाहीर करताना मला आनंद होत आहे. येत्या सहा आठवड्यांत त्या पदभार स्वीकारतील. राजीनामा दिल्यानंतर माझी भूमिका कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी अशी असेल,” अशा आशयाचे ट्वीट त्यांच्याकडून करण्यात आले आहे. एलन मस्क यांना कधीच फार काळासाठी हे पद सांभाळायचे नव्हते. या पदासाठी त्यांच्याकडून एका योग्य व्यक्तीचा शोध घेण्यात येत होता.

एलन मस्क यांनी 27 ऑक्टोबर 2022 मध्ये 44 बिलीयन डॉलर म्हणजेच भारतीय रकमेनुसार तब्बल 03 लाख 36 हजार करोड रुपयांत त्यांनी ट्विटरची खरेदी केली होती. तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्यांनी चार महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ट्विटरचे मालकी हक्क विकत घेताच त्यांनी आधीचे भारतीय वंशाचे सीईओ पराग अग्रवाल यांना पदावरून काढून टाकले. तसेच त्यांनी कंपनीच्या अधिकारी वर्गात देखील मोठे बदल केले. मसक यांनी आत्तापर्यंत ट्विटरच्या अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले होते. पण एलन मस्क यांनी सूत्र हाती घेताच त्यांनी जनमत घेत लोकांच्या मतांचा आदर करत ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट सुरू केले होते. तर चौथा सर्वात मोठा निर्णय म्हणजे मस्क यांनी ट्विटरच्या ब्लू टीकसाठी पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे याआधी फॉलोअर्सच्या जोरावर मोफत मिळणाऱ्या मोफत टीकसाठी आता पैसे मोजून ती टीक घ्यावी लागणार आहे. यासाठी ट्विटरने सबस्क्रिप्शन प्लॅनदेखील सुरू केला आहे.

First Published on: May 12, 2023 8:25 AM
Exit mobile version