एलन मस्क यांनी ट्विटरच्या धोरणात केला नवा बदल; कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश

एलन मस्क यांनी ट्विटरच्या धोरणात केला नवा बदल; कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश

एलन मस्क यांनी आता पूर्णपणे ट्विटरचे अधिकृत मालक बनले आहे. मस्क यांनी US $ 44 अब्ज डॉलरमध्ये ही कंपनी विकत घेतली आहे. यानंतर आता मस्क यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान कंपनीतून काढून टाकण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश व्यवस्थापनास देण्यात आले आहेत. यासोबतच त्यांनी मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरच्या धोरणांमध्ये बदल करण्यास सांगितले आहे.

दरम्यान मस्क यांनी ट्विटरती मालकी घेताच तात्काळ त्यांनी ट्विटर सीईओ आणि पॉलिसी चीफ यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि वित्त प्रमुख नेड सेगल यांनी कंपनीचे सॅन फ्रान्सिस्को मुख्यालय सोडले आहे.

मस्क यांनी ट्विटरसाठी कंटेंट मॉडरेशन कौन्सिल तयार करण्याची घोषणा केली आहे. मस्क यांनी स्पष्ट सांगितले की, काउंसिल बैठकीच्या पूर्वी बंदी घालण्यात आलेले अकाऊंट पुन्हा सुरू करण्याबाबतकोणताही निर्णय घेतला जाणार नाही. या काउंसिलच्या आढावानंतरच बंद अकाऊंट पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला जाईल.

एलन मस्क यांनी ट्विटरची अधिकृत मालकी स्वीकारण्याच्या काही तासांपूर्वी ट्विट केले होते की, चांगले दिवस येणार आहेत. सोबतच्या त्यांनी ट्विटच्या बायोमध्ये चीफ ट्विटर असंही लिहिलं. याशिवाय एक व्हिडीओ ट्विट करत ट्विटरची मालकी स्वीकारल्याचा आनंद व्यक्त केला.

ट्विटरचे म्हणणे आहे की त्याचे दररोज 238 दशलक्ष युजर्स आहेत. अनेक कंपन्या, राजकारणी, पत्रकार आणि इतर सार्वजनिक व्यक्तींसाठी ट्विटर हे आवडते व्यासपीठ आहे. मस्क यांनी जाहिरातदारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, त्यांना ट्विटर हे एक व्यासपीठ बनवायचे आहे जेथे प्रतिस्पर्ध्याच्या दृष्टिकोनावर निरोगी मार्गाने चर्चा केली जाऊ शकते.


पाकिस्तानात कुराणाचा अपमान; जमावाकडून हल्लाचा प्रयत्न

First Published on: October 30, 2022 10:28 AM
Exit mobile version