दुबईच्या विमानात ‘हिंदू मिल’ बंद!

दुबईच्या विमानात ‘हिंदू मिल’ बंद!

दुबईचे अमीरात विमान (प्रातिनिधिक चित्र)

दुबईतील अमीरात विमान कंपनीने प्रवाशांसाठी ‘हिंदू मिल’ची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे कंपनीच्या मेन्यू कार्डमध्ये प्रवाशांसाठी ‘हिंदू मिल’चा पर्याय उपलब्ध नसणार आहे. अनेक आंतरराष्ट्रीय विमानसेवांमध्ये प्रवाशांना त्यांच्या आवडीनुसार जेवणाची सुविधा उपलब्ध असते. प्रामुख्याने भारतीय ‘हिंदू मिल’मध्ये सात्विक जेवणाची निवड करतात. बरेचदा प्रवास सुरू होण्यापूर्वीच ते जेवण ऑर्डर करतात. मात्र आता अमीरात विमानात प्रवाशांना हिंदू जेवण मिळणार नाही. परंतू, विमान प्रवासादरम्यान भारतीय ठराविक ठिकाणांवरील शाकाहारी जेवणाची आगाऊ ऑर्डर देऊ शकणार आहेत, असेही विमान कंपनीने म्हटले आहे.

बहुतांश विमानात ‘हिंदू मिल’

जगभरातील विमान कंपन्यांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाचा पर्याय उपलब्ध असतो. प्रामुख्याने बीफ (बैलाचे) आणि पोर्क (डुकराचे) न खाणाऱ्या प्रवाशांसाठी हे पर्याय उपलब्ध केले जातात. एअर इंडिया आणि सिंगापूर एअरलाइन्स या दोन्ही विमानात मेन्यूमध्ये सात्विक जेवणाची सोय असते.

प्रवाशांच्या मागणीनंतर निर्णय

आम्ही आमच्या प्रवाशांची मतं जाणून घेतली. बहुतांश प्रवाशांनी हिंदू मिल बंद करण्याची मागणी केली. त्यामुळेच विमानप्रवासात हिंदू मिल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे अमीरात विमान कंपनीच्यावतीने सांगण्यात येत आहे. त्यांच्या ऑफिशिअल वेबसाइटवर धार्मिक जेवणाच्या यादीत भारतीय शाकाहारी जेवण, शाकाहारी जैन भोजन आणि कोशेरे भोजनाचा समावेश होता. मात्र आता हे पर्याय उपलब्ध असणार नाहीत. परंतू विमान कंपनीच्या मते, प्रवाशांना स्थानिक दुकानांमधून विमानाच्या आतही जेवण मागवता येणार आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही. शिवाय प्रवाशांना विविध पदार्थांचा पर्यायही उपलब्ध होणार आहे. यामध्ये हिंदू मिल, जैन मिल, भारतीय शाकाहारी, कोशेर मिल, बीफ तसेच मांसाहार विरहीत जेवण मागवता होऊ शकते.

First Published on: July 4, 2018 7:15 PM
Exit mobile version